एचवनबी विजा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यारा ट्रंपी उद्योग
प्रेसिडेंट ट्रंप आणि अमेरिकन सरकारनं एचवनबी विजाच्या तरतुदीत मोठा फरक करून गोंधळ उडवला आहे. तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी बाजाराच्या हिशोबात महत्वाची कसबं असणाऱ्या लोकांना हा विजा दिला जातो. या विजावर अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना किमान १.३ लाख डॉलर पगार दिला पाहिजे अशी अट नव्या तरतुदीनं घातली आहे. सध्या ६० हजार ते १ लाख डॉलर वेतनमान आहे. गेली दहाएक वर्षं ६० हजार ते १ लाख वेतनावर बाहेरून येणारी माणसं खुष होती आणि अमेरिकन समाजही सुखात होता. एचवनबी विजा घेणाऱ्यात बहुसंख्य आयटी…