कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा
आंद्रे वायदा (Andhrzej Wajda) या पोलिश चित्रपट दिद्गर्शकाचं ९ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. वयाच्या नव्वदाव्या वर्षी. वायदानं ४० पेक्षा जास्त चित्रपट केले. थिएटरही केलं. चित्रपट आणि थिएटर अशा दोन्ही ठिकाणी तो आलटून पालटून असे. २००० साली वायदाना मानद ऑस्कर मिळालं. त्यांच्या तीन चित्रपटांना ऑस्कर नामांकनं मिळाली. वायदाच्या एका फिल्मचं नाव होतं अॅशेस अँड डायमंडस. पोलंडवरच्या नाझी सत्तेविरोधातल्या लढाईची पार्श्वभूमी होती. सिनेमाच्या शेवटल्या दृश्यात नाझींच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता कचऱ्याच्या ढिगावर मरून पडलाय. ही फिल्म दाखवण्यात आली त्या १९५८ सालात…