दारुबंदी. एक देशी वैश्विक घोळ
दारूबंदीचा घोळ बिहार सरकारनं नोव्हेंबर २०१५ मधे दारुबंदी केली. दारू उत्पादन, व्यापार, बाळगणं आणि पिणं यावर सरकारनं बंदी घातली. सप्टेंबर २०१६ मधे पाटणा ऊच्च न्यायालयानं बंदी बेकायदेशीर ठरवली. बिहार सरकार आता या बंदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. बंदीचा सुधारीत आदेश बिहार सरकारनं लगोलग जाहीर केला आहे. पुरुष दारू पितात, उत्पन्नाचा बराच भाग दारूवर खर्च करतात, कौटुंबिक आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत, नशेमधे कुटुंबियांना (विशेषतः बायकांना) मारहाण करतात अशा फार तक्रारी बिहारी स्त्रियांनी केल्या आणि दारुबंदीची मागणी केली. दारूमुळं भ्रष्टाचारही…