गोरक्षक आणि शरीयारक्षक
गोरक्षक आणि शरीयारक्षक गुजरातेत उनामधली घटना. परंपरेनं जनावरांचं कातडं काढण्याचा व्यवसाय करणाऱ्या बालू सर्वैय्या आणि त्याच्या कुटुंबातल्या सहा माणसांना गोरक्षकांनी बडवून काढलं. गोरक्षकांचं म्हणणं होतं की त्या लोकांनी गाय मारली. गाय मारली की मेलेल्या गायीचं कातडं सर्वैय्या काढत होते याची चौकशी गोरक्षक मंडळींनी केली नाही. गायी मारायला गुजरातेत बंदी आहे. गाय मारणं हा गुन्हा केल्याची तक्रार आली तर चौकशी करून खटला भरण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. गोरक्षक स्वतःच पोलिस झाले. पोलिसच नव्हे तर न्यायाधीशही झाले. खटला वगैरेच्या भानगडीत न पडता…