भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.
कायदा या कल्पनेवर भारताचा विश्वास नाही. कायद्याला अनेक पर्याय भारतीय जनतेनं शोधले आहेत. कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो. सलमान खान खटल्याची सुरवात अशी झाली. २८ सप्टेंबर २००२ च्या मध्यरात्रीनंतर वांद्र्याच्या फूटपाथवर सलमान खानची गाडी आदळली. एक माणूस मेला, चार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सलमानच्या रक्ताची तपासणी करून त्याला सोडून दिलं. २९ रोजी माध्यमांमधे ही घटना लोकांना पहायला मिळाली. ३० तारखेच्या पेपरात सविस्तर बातम्या आल्या. तरी सलमान बाहेर. जणू काही घडलंच नव्हतं. त्या वेळी निखील वागळे…