धर्मातून बाहेर पडण्याची सोय
” आपल्या ब्लॉगवरची २४ डिसेंबर २०१४ ची ‘धर्माचा दरवाजा’ नावाची post वाचली. मला एक प्रश्न बरीच वर्षे सतावतो आहे. जर एखाद्या माणसाला कुठल्याच धर्माचे label नको असेल, तर अशी काय सोय आहे की तो माणूस त्याला जन्माने मिळालेल्या धर्मातून बाहेर पडेल आणि त्यासाठी त्याला दुसरा कोणताही धर्म स्वीकारायला लागणार नाही…?? उदाहरणार्थ: हिंदू कुटुंबात जन्मलेला माणूस हिंदू असतो. त्याला स्वत: विचार करता यायला लागला आणि तो मनाने संपूर्ण नास्तिक झाला. तर अशा वेळी त्याला धर्मात राहून धर्म न पाळणे असा पर्याय…