धर्माचा दरवाजा
इराकमधे आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेनं गावंच्या गावं ताब्यात घेतली,त्यातल्या माणसांना ” आपल्या ” इस्लामचे बंदे व्हा असा आदेश दिलाय. जे हा आदेश पाळणार नाहीत त्यांचा छळ होतो, त्याना ठार मारलं जातं. आयसिसचा इस्लाम हा जगातल्या इतर रूढ इस्लामांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो नेमका कसा आहे आणि वेगळा कां आहे हे नीट समजलेलं नाही. सामान्यतः अल बगदादी हा त्यांचा पुढारी जे म्हणेल ते मान्य करणं असा त्या इस्लामचा अर्थ आहे. इराकमधले मुस्लीम असोत की ख्रिस्ती की आणखी कोणी. त्या सर्वांना…