शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे
शहरातल्या मोकळ्या जागा, गच्च्या, बाल्कन्या इत्यादी ठिकाणी करता येणारी शेती म्हणजे शहर शेती. शेती म्हणजे वनस्पती वाढवण्याची सवय माणसाला कित्येक हजार वर्षांपासून आहे. खतं, जंतुनाशकं, संस्कारित बिया आणि सिंचन या गोष्टी हाताशी आल्यावर विसाव्या शतकात शेतीबद्दलच्या कल्पना बदलल्या. माहिती तंत्रज्ञानानं जगातल्या शेतीत गुंतलेल्या अगणित प्रक्रियांची माहिती प्रकाशापेक्षाही जास्त वेगानं गोळा करणं आणि त्या माहितीची तितक्याच वेगानं घुसळण करून वनस्पतीचा वाढीला क्रांतीकारक दिशा दिली. शेतीबद्दलची पारंपरीक कल्पना आणि व्यवहार आता एकदमच बाजूला पडला आहे. निसर्गानं वनस्पतीच्या उत्पादनावर टाकलेल्या मर्यादाही नव्या तंत्रज्ञानानं…