रवांडा
रुवांडा या आफ्रिकन देशात वीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९४ च्या एप्रिल महिन्यात हत्याकांड सुरु झालं. एक महिन्याभरात नऊ ते दहा लाख टुट्सी जमातीची माणसं मारली गेली. रुवांडाच्या अध्यक्षांचं विमान राजधानी किगालेमधे उतरत असताना उडवण्यात आलं आणि त्यात अध्यक्ष ठार झाले. अध्यक्ष हुटू या जमातीचे होते. हुटू आणि टुट्सी या जमातींमधे पूर्वापारपासून वैर होतं. टुटसींनी आपल्या नेत्याला मारलं असं ठरवून हुटूनी हत्याकांड पार पाडलं. महिनाभर हत्याकांड चालल होतं. तलवारी, सुरे, चाकू इत्यादी प्राथमिक शस्त्रं वापरून माणसं कापण्यात आली. काहीच हातात मिळाल नाही…