माझं दुष्काळ-सुकाळ हे मौजेनं प्रकाशित केलेलं पुस्तक छापून झालंय. लवकरच ते पुस्तकांच्या दुकानात विकण्यासाठी जाईल. जतमधे कित्येक शतकं पाऊस पडतो पण लहरी. त्यामुळं पिकाचं गणित कोसळतं. जेवढा पाऊस पडतो तो खरं म्हणजे जतच्या जनतेला अगदी सुखात ठेवण्यासाठी पुरेसा आहे येवढंच नव्हे तर शेतीतलं उत्पन्न घेऊनही पाणी उरू शकतं. तरीही दर वर्षी तिथं टंचाई निर्माण होते. वर्षाचे चार एक महिने पाण्याची टंचाई असते, पाणी बाहेरून आणाव लागतं.गुरं जगवण्यासाठी चारा बाहेरून आणावा लागतो, लोकांना जगवण्यासाठी नाना प्रकारची मदत करावी लागते. कित्येक शतकं…
मोदी पर्वाची सुरवात झाली आहे. मोदींची तुलना जगातल्या इतर दोन नेत्यांशी होतेय. मार्गारेट थॅचर आणि देंग. थॅचरनी ब्रीटनचं ग्रेटनेस पुन्हा परत आणायचं ठरवलं होतं. थॅचर एका दुकानदाराची कन्या होत्या. मोदी छोट्या व्यवसायिकाकडं जन्मले आणि वाढले आणि भारताचं गतवैभव पुन्हा मिळवण्याचा त्यांचा इरादा आहे. थॅचर एकहाती कारभार करत, त्यांना त्यांच्या कामात कोणाची ढवळाढवळ चालत नसे. नको असलेली माणसं त्या धडाधड काढून टाकत. मोदीही आपल्या पेक्षा वेगळ्या विचारांची माणसं सहन करत नाहीत. थॅचर उघड आणि टोकाच्या भांडवलशाही-मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेच्या समर्थक होत्या. सरकार…
मुंबईत ग्रँट रोड स्टेशनसमोर एक रेस्तराँ होतं. परवापरवापर्यंत. शंभरवर्ष झाली त्या रेस्तराँला. इमारत जुनी झाल्यानं ती पाडून तिथं नवी इमारत उभी रहाणार असल्यानं मेरवान बंद झालंय. मुंबईतल्या किती तरी पिढ्यांनी मेरवानचे केक, पुडिंग, बनमस्कार, खारी आणि चाय पचवलेत. पत्रकार, विचारवंत, वकील, विद्यार्थी, राजकीय कार्यकर्ते, कवी, लेखक, भणंग इत्यादी लोकांना मेरवानमधे आश्रय होता. गोल टेबलं, लाकडी खुरच्या, मोठ्ठे गरगरते पंखे, आरसे, मेन्यूच्या पाट्या, वेटरनं दिलेल्या पदार्थांच्या ललकाऱ्या, वेटरनं खांद्यावरच्या कापडानं फलकारे मारून साफ केलेलं टेबल आणि अर्थातच चहा, बनमस्का, दट्ट्या ओढून…
यंदाच्या निवडणुकीबाबतची काही निरीक्षणं. राजकीय पक्षांनी मतदारांचं रूपांतर जात-धर्माच्या मतपेढ्यांत करून टाकलं आहे. मतदारही ( अल्पांश अपवाद ) जात वा धर्म या समूहमानसानंच मतदान केलं. या निवडणुकीपुरतं तरी म्हणता येईल की माणूस समूहात विरघळला आहे. मतदान करतांना, राजकीय निर्णय घेताना तो समूहमनानं विचार करतो, व्यक्ति म्हणून निर्णय घेत नाही. आर्थिक प्रश्नाबाबत राजकीय पक्ष विचार करायला तयार नाहीत, मतदारही त्याना आर्थिक प्रश्नावर बोला असं ठामपणे बोलले नाहीत. आर्थिक प्रश्न महत्वाचे अशासाठी की आपल्याला कोणता अर्थविचार हवा आहे याचा विचार राजकीय पक्ष…
नॅचरल शुगर या कारखान्यानं केलेल्या दोन कामांचे व्हिडियोज सोबत. एक काम म्हणजे जलसंधारणाचं. जलसंधारण म्हणजे पाणी आणि माती टिकवून धरणं. दोन्ही गोष्टी जमिनीत टिकल्या नाहीत तर जमीन निकस होत जाते. दोन्ही गोष्टी जमिनीत टिकवण्याचा परंपरागत नैसर्गिक मार्ग म्हणजे बांध बंदिस्ती. एकेकाळी ते केलं जात असे. परंतू काही शेकडा वर्षं शेतकऱ्याला पोषक अशा व्यवस्था समाजात न झाल्यानं शेतकऱ्याकडं पैसेच उरत नसत. त्यामुळं बांध बंदिस्ती शक्य झाली नाही. परिणामी जमिनी खराब झाल्या. यातून वाट काढण्यासाठी गेल्या पंचवीस तीस वर्षात सरकारनं जलसंधारणाची कामं…
सेलफोवरून मतदान. मतदार यादीतल्या गोंधळामुळं यंदाच्या निवडणुकीत लाखो मतदारांना मतदान करता आलं नाही. असं दिसतंय की मतदार यादी तयार करताना अनेक चुका त्या यंत्रणेतल्या माणसांकडून झाल्या आहेत. त्याच बरोबर मतदारांनीही पुरेशी जागरूकता दाखवलेली नाही. यादी नव्यानं तयार झाल्यावर ती वेबसाईटवर टाकण्यात आली होती, यादीच्या सीड्या राजकीय पक्षाना देण्यात आल्या होत्या. फार कमी मतदारांनी यादीतल्या चुका दुरुस्त करण्याची तसदी घेतली. तेव्हां मतदार नोंदणी यंत्रणेतले दोष दूर करून आणि मतदारांनी थोडीशी जागरूकता दाखवून या बारीला झालेले घोटाळे भविष्यात टाळता येतील. तथापि उपलब्ध…
दिनानाथ बात्रा या एका शाळेच्या हेड मास्तरना 1999 साली सत्तेत आलेल्या भाजपनं इतिहास पुनर्लेखनाच्या कामी नेमलं. पाठ्य पुस्तकाचं पुनर्लेखन ही त्यांची जबाबदारी. त्यांनी पाठ्यपुस्तकातून जात आणि गोमांसभक्षणाचे उल्लेख वगळले. इतरही अनेकानेक बदल केले. त्यातला एक बदल म्हणजे प्राचीन भारतात विमानं आणि अणुबाँब होते. बात्रा यांना हव्या असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त सगळ्या गोष्टी वगळणं आणि त्या गोष्टी कुठंच प्रसिद्ध होता कामा नयेत अशी मोहीम त्यांनी सुरू केली. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून वेंडी रॉजर यांचं The Hindus. An Alternative History या पुस्तकावर बंदी…
मुझूफ्फरनगरला गेलो होतो. दिल्लीहून मुझफ्फरनगरमधे जाणं हे एक दिव्य असतं. अत्यंत घाण बसेस. सिटाही जागेवर नसतात, टायरवर बसावं लागतं. रस्ते खराब. वाटेत नाना प्रकारची वाहनं उलट सुलट बाजूनं मनास वाटेल तशी फिरतात. परिणामी वाहतुक तुंबा. एका ठिकामी मी दोन तास अडकून पडलो होतो. त्या वेळी वाहनांच्या दंगलीमुळं धुळीचे लोट वाहत होते. ती धूळ आसपासच्या रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांवर बसत होती. धूळ आणि माशा यांच्यात स्पर्धा चालली होती. मुझफ्फरनगर आणि आसपासची गावंही अस्वच्छ आणि साधनहीन दिसतात. 1980च्या आसपास मी मेरठ आणि मुझफ्फऱनगरमधे चौधरी…
रुवांडात हत्याकांड चाललं होतं. जगातला कोणताही देश ते थांबवायला पुढं येत नव्हता. युनोची पाच पन्नास निःशस्त्रं माणसं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती.त्या पैकी एक, त्याचं नाव एमबाये. डोक्यावर युनोची निळी टोपी. अंगावर निळं बुलेटप्रूफ जॅकेट. एकही शस्त्रं नाही. हा माणूस रक्ताळलेले सुरे आणि बंदूक घेतलेल्या माणसासमोर उभा राहून म्हणे की समोरच्या माणसाला उगाचच मारू नका. एका चर्चमधे तर तिथला पादरीच खुनी झाला होता. हातात कलाश्निकाव घेऊन तो चर्चमधे आश्रयाला आलेल्या निर्वासितांना मारत होता.एक स्त्री आश्रयाला आली. पादऱ्यानं तिच्यावर बंदूक उगारली….
अरूण शौरी, सोली सोराबजी, मेघनाद देसाई या तीन विचारवंतांनी मोदींनी राज्य ग्रहण केल्यानंतर काय काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितलं आहे. भाजप-मोदींच राज्य येणार असं त्यांनी गृहीत धरलं आहे. तीनही माणसं समतोल आहेत, टोकाची पक्षपाती नाहीत. एकादी गोष्ट त्यांना आवडली असली, पटली असली तरी ते त्या गोष्टीला बौद्धिक कसोट्या लावून, तोल सांभाळून विचार करतात. मेघनाद देसाई म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लागलेली आहे. त्याला आधीचं सरकार कारण आहे. परंतू त्यांना शिव्या देत न बसता अर्थव्यवस्था सुधारायची तर फार…