निवासी डॉक्टर बळीचा बकरा
सरकारी इस्पितळात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना एकापेक्षा अधिक वेळा रोग्यांच्या संबंधितांनी मारहाण केली. काही ठिकाणी छोट्या खाजगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनाही मारहाण झाली. रोग्याला योग्य उपचार न मिळणं, वेळेवर उपचार न मिळणं, उपचाराचा उपयोग न होऊन रोगी दगावणं या कारणांवरून चिडलेल्या लोकांनी डॉक्टरांना मारहाण केली. निवासी डॉक्टरांनी संरक्षणाची मागणी केली. एकदा नव्हे तर अनेक वेळा. त्यांना संरक्षण मिळालं नाही. अऩेक ठिकाणी पोलिस किंवा रुग्णालयाचे रक्षक हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. बरेच वेळा मारहाण करणाऱ्या लोकांची संख्या येवढी मोठी असते की…