अमेरिकन सरकार उध्वस्थ होतं तेव्हां आपोआप होणारा संकटकालीन प्रेसिडेंट

अमेरिकन सरकार उध्वस्थ होतं तेव्हां आपोआप होणारा संकटकालीन प्रेसिडेंट

कल्पना करा. दहशतवाद्यांनी अमेरिकेत संसदेवर हल्ला केलाय. त्यात राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, सर्व संसद सदस्य मारले गेलेत. अमेरिकन राज्यघटनेत प्रेसिडेंटनं देशाला उद्देशून स्टेट ऑफ द युनियन भाषणं केव्हाही आणि कितीही करावीत अशी तरतूद आहे. सामान्यतः प्रत्येक प्रेसिडेंट वर्षातून एकदा असं भाषण करत असतो. उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, मंत्रीमंडळ अशी सगळी माणसं या भाषणाला हजर असतात.१९६० च्या दशकात जगावर अणुयुद्धाचं सावट पसरलं होतं तेव्हां अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो या भीतीनं अमेरिकन सरकारनं एक संकटकालीन तरतूद केली. स्टेट ऑफ द युनियन भाषण…

Read More Read More

शिव सेनेचा आधार, महिला.

शिव सेनेचा आधार, महिला.

The Dashing Ladies of Shiv Sena POLITICAL MATRONAGE IN URBANIZING INDIA Tarini Bedi Aleph एकदा मुंबईत गिरगावात केळेवाडीच्या तोंडाशी मला एक महिला भेटल्या. साधारण उंची, सडपातळ, डोळ्यावर जाड काचांचा चष्मा. त्यांची वडापावची आणि चहाची गाडी होती. आसपासची  बरीच माणसं त्यांना ओळखत होती. त्यांचा दरारा होता. सभोवतालच्या वातावरणारून ते कळत होतं. मी सहज त्यांची जनरल चौकशी करणारा प्रश्न विचारला आणि त्या सुटल्याच. त्या शिवसैनिक होत्या. तसं त्यांनी अभिमानानं सांगितलं. म्हणाल्या ” कोणालाही विचारा. आपली वट आहे या विभागात. कुठल्याही पोलिस चौकीत…

Read More Read More

वसंत सरवटे, विजय तेंडुलकर, यांची शाखा

वसंत सरवटे, विजय तेंडुलकर, यांची शाखा

वसंत सरवटे गेले. शाखेवरचा एक स्वयंसेवक गळाला. रविवारची शाखा. शाखेचे संस्थापक विजय तेंडुलकर. शाखेत उपस्थित रहाणारे स्वयंसेवक- वसंत सरवटे, बाजी कुलकर्णी, निळू दामले. साधारणपणे रविवारी शाखा भरे. तेंडुलकर कधी कधी परगावी असत. तेव्हां ते अनुपस्थित. बरेच वेळा निळू दामले दुनियाभर भटकत असत. तेव्हां ते अनुपस्थित. अशा वेळी आठवड्यातल्या इतर दिवशी शाखा भरत असे, इतर स्वयंसेवक शाखा भरवत. शाखेवर गेस्ट स्वयंसेवकही येत असत. जसे अवधुत परळकर, सुबोध जावडेकर, संदेश कुलकर्णी, पंकज कुरुलकर, सचिन कुंडलकर. शाखेचा कार्यक्रम म्हणजे पुस्तकांची चर्चा, पुस्तकांची देवाण…

Read More Read More

नोटरद्दीकरणाचा आतबट्ट्याचा रहस्यमय निर्णय

नोटरद्दीकरणाचा आतबट्ट्याचा रहस्यमय निर्णय

मोदींनी वरील निर्णय जाहीर केला तेव्हां ५०० आणि १००० च्या सुमारे १५.४ लाख कोटी नोटा व्यवहारात होत्या. नव्या ५०० आणि २००० च्या नोटा चलनात येतील असं मोदी  यांनी जाहीर केलं. १५.४ कोटी जुन्या नोटांपैकी सुमारे १३ टक्के नोटा खोट्या, बेहिशोबी असतील असं अर्थखात्याचं अनधिकृत म्हणणं होतं. म्हणजे तेवढ्या वगळून बाकीच्या किमतीच्या नव्या नोटा व्यवहारात जातील आणि हिशोबी व्यवहार करणाऱ्या जनतेला तेवढ्या नोटा परत मिळतील अशी अपेक्षा होती. भारतात नोटा छापण्याचे सहा कारखाने आहेत. त्यांची क्षमता पहाता आणि त्यांनी ५०० व…

Read More Read More

पाकिस्तानचं लष्कर

पाकिस्तानचं लष्कर

जनरल बाजवा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख झाले आहेत. पाकिस्तानात लष्कर प्रमुखाची निवड पंतप्रधान करत असतात.    पंतप्रधान लष्कर प्रमुख निवडतांना आपली सोय पहातात, लष्कर आपल्या बाजूला राहील अशा रीतीनं लष्कर प्रमुख निवडतात. प्रमुखपदाच्या रांगेत वरिष्ठतेनुसार क्रमांक लागणाऱ्या अनेकांना दूर सारून आपल्या ताटाखालचं मांजर बनेल असं मनात ठेवून पंतप्रधान लष्कर प्रमुख निवडतात. त्याच परंपरेनुसार पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल बाजवा यांना निवडलं आहे. तीन ज्येष्ठांना बाजूला सारून. धार्जिणा लष्कर प्रमुख  पंतप्रधानाला उपकारक ठरतोच असं नाही. किंबहुना आजवरचा इतिहास सांगतो की लष्कर प्रमुख…

Read More Read More

कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र.

कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र.

कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र. KARL MARX – GREATNESS AND ILLUSION By  GARETH STEDMAN JONES.                                Penguin .  Hard Cover- Rs. 2561. Kindle- Rs. 1223. मार्क्सचं एक नवं प्रज्ञात्मक चरित्र नुकतंच प्रसिद्ध झालंय. मार्क्स आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी लेखक स्टेडमन जोन्स यांनी कौशल्यानं वेगळ्या केल्या आहेत.  मार्क्सनं जे लिहून ठेवलं त्यात बदल करून, त्यात गाळ साळ करून एंगिल्सनं मार्सवाद तयार केलाय असं लेखकाचं म्हणणं…

Read More Read More

इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी

इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी

इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी. Chronicle Of A Last Summer.         Yasmine El Rashidi        Tim Duggan Books        120 pages  कचऱ्यानं भरलेले रस्ते. घाण आणि क्रूर इमारती. पोचे आलेल्या गाड्यांचे कर्कश्श हॉर्न. कार, टेंपो,सायकली, रेकले यांच्या गर्दीतून वाट काढणारी गाढवं, उंट गाड्या. वाहतुक तुंबल्यावर कारमधल्या माणसांना वस्तू विकणारी मुलं. दुर्गंधी. बेढब घरं. गिलावा नसलेल्या भिंती. … एल रशिदीच्या क्रॉनिकल ऑफ लास्ट समर या कादंबरीतून कैरो शहराचा एकही तपशील निसटत नाही. कैरोत राहिलेल्या…

Read More Read More

जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं ओळखली जाणारी इमारत

जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं ओळखली जाणारी इमारत

ही इमारत २०४ चर्नी रोड या नावानं ओखळली जात असे. १९६७ ची स.का.पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणुक जॉर्जनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बाँबे लेबर युनियन, म्युनिसिपल मझदूर युनियन इत्यादी अनेक कामगार संघटनांच्या कचेऱ्या असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं. जॉर्ज फर्नांडिस इथंच बसत. याच इमारतीत जॉर्ज यांची कामगार चळवळ कारकीर्द  आकाराला आली. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हां गोदीबाहेरच्या फूटपाथवर रहात आणि या कचेरीत येत. नंतर यथावकाश ते हाकेच्या अंतरावर ह्यूजेस रोडवरच्या पानगल्लीतल्या एका छोट्या घरात…

Read More Read More

कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

आंद्रे वायदा (Andhrzej Wajda) या पोलिश चित्रपट दिद्गर्शकाचं ९ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. वयाच्या नव्वदाव्या वर्षी. वायदानं ४० पेक्षा जास्त चित्रपट केले. थिएटरही केलं. चित्रपट आणि थिएटर अशा दोन्ही ठिकाणी तो आलटून पालटून असे. २००० साली वायदाना मानद ऑस्कर मिळालं. त्यांच्या तीन चित्रपटांना ऑस्कर नामांकनं मिळाली.   वायदाच्या  एका फिल्मचं नाव होतं अॅशेस अँड डायमंडस. पोलंडवरच्या नाझी सत्तेविरोधातल्या लढाईची पार्श्वभूमी होती. सिनेमाच्या शेवटल्या दृश्यात नाझींच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता कचऱ्याच्या ढिगावर मरून पडलाय. ही फिल्म दाखवण्यात आली त्या १९५८ सालात…

Read More Read More

ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले

ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले

माध्यमांचं भाकित, अंदाज, अभ्यास खोटे ठरले.   डोनल्ड ट्रंप निवडून येणार नाहीत असं अमेरिकन आणि युरोपिय माध्यमांना वाटत होतं.   लॉर्ड मेधनाद देसाई या बहुदा एकट्याच पत्रकारानं   ट्रंप निवडून येतील असं भाकित केलं होतं. ट्रंपना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा दोन लाख मतं कमी पडली हे खरं. ते इलेक्टोरल व्होट या चमत्कारिक अमेरिकन निवडणुक पद्धतीमुळं प्रेसिडेंट झाले हेही खरं. परंतू इतकी मतं ट्रंप यांना मिळतील असं कोणीही माध्यमातलं माणूस माणूस म्हणत नव्हतं. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी जिंकतील असं माध्यमं म्हणत…

Read More Read More