शेतकरी संप
एक अटळ गोष्ट घडली. शेतकऱ्यांनी संप केला. संप म्हणजे शेतमाल बाजारात जाऊ देण्याऐवजी रस्त्यावर नष्ट केला. दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाला रस्त्यावर ट्रकखाली चिरडला. वरवर पहाता तरी शेतकरी कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली संघटित नाही. शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा ही कित्येक वर्षं जुनीच मागणी शेतकरी करत होता. यंदा तुरीचं भरपूर पीक आलं पण एक तर तुरीला भाव मिळाला नाही आणि सरकारनं चांगल्या भावानं तूर खरेदी केली नाही. शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. भाजप आणि सरकार म्हणतय की त्यांनी शेतकऱ्यासाठी अनेक योजना…