Browsed by
Category: लेख

वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी

वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी

राम अडवाणी बुक सेलर  (लखनौ, १९५२) या दुकानाचं आता काय होईल? दुकानाचे मालक राम अडवाणी वयाच्या ९५ व्या वर्षी परवा वारले. त्यांचा मुलगा रानीखेतमधे असतो, नात लंडनमधे असते. ते राम अडवाणी पुस्तक दुकान पुढं चालवणार? समजा त्यांच्या मुलानं आणि नातीनं ते चालवायचं ठरवलं किंवा कोणी ते विकत घेतलं तरी ते  ‘ राम अडवाणींचं पुस्तकांचं दुकान ‘  रहाणार?  राम अडवाणी यांचं पुस्तकांचं दुकान ही लखनौच्या संस्कृतीची एक लक्षणीय ओळख आहे.  राम अडवाणी मुळातले पाकिस्तानातले. फाळणीनंतर भारतात आले.  पाकिस्तानात त्यांचं पुस्तकाचं दुकान…

Read More Read More

स्टालीनच्या खुल्या छळछावणीत जगणाऱ्या संगितकाराची गोष्ट

स्टालीनच्या खुल्या छळछावणीत जगणाऱ्या संगितकाराची गोष्ट

The Noise Of Time. Author : Julian Barnes Publisher : Knopf ।। दी नॉईज ऑफ टाईम ही ज्युलियन बार्नस या मॅनबुकर बक्षिस विजेत्याची ताजी कादंबरी.  दिमित्री शोस्टाकोविच (१९०६-१९७५) या रशियन संगीतकाराच्या जीवनावर आधारलेली. शोस्टाकोविचनं अनेक ऑपेरा लिहिले, सोलो पियानो मैफिली केल्या, संगीत रचलं, चित्रपटांना संगित दिलं. त्यानं दिलेल्या सिनेमा संगिताला एकदा ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.शोस्टाकोविच युरोप आणि अमेरिकेत गेला, तिथं भाषणं केली, संगीत सादर केलं. काही संगीत समीक्षकांनी त्याला ग्रेट म्हटलं, काहींनी दुय्यम दर्जाचा ठरवलं. सोवियेत युनियनच्या सरकारांनी त्याला अनेक…

Read More Read More

मीठ तयार करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट

मीठ तयार करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट

माय नेम ईज सॉल्ट. ।। नजर पोचेस्तवर दिसणारी उजाड जमीन.डोंगर नाही. झाड नाही. घर नाही. एकही प्राणी नाही. एकही माणूस नाही. वर तळपणारा सूर्य, खाली रखरखीत जमीन. एक बाईक. मग बाईकपाठून येणारा एक ट्रक. ट्रकवर पाच सात माणसं. बाजलं. पत्रे. पिंपं. भांडीकुंडी. बांबू. माणसं घर बदलतात तेव्हां असं सामान ट्रकवर लादून नेतात. माणसं कुठल्या नव्या घरात निघालीत? समोर तीनशेसाठ अंशात एकही घर दिसत नाहीये.  ट्रक थांबतो.  उजाड आसमंत. ट्रकमधली माणसं खाली उतरतात. ट्रकवरचं सामान उतरवतात. बांबू उभे करून, पत्रे जोडून…

Read More Read More

पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

 पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण. पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारत पाक शांतता चर्चा तूर्तास स्थगित असल्याचं पत्रकारांना सांगितलंय. ९ नोव्हेंबर २०१५ साली ही चर्चा परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी सुरु केली होती. काश्मिरचा मुद्दा वगळून चर्चा होऊच शकत नाही;  बलुचिस्तानमधल्या बंडाला भारत चिथावणी देत आहे असे आरोप बासित यांनी केले.  चर्चा स्थगितीचं तात्कालिक कारण होतं पाकिस्तानी टीमचा पठाणकोट दौरा.     पाकिस्तानी दौऱ्याच्या बदल्यात भारताचा दौरा असं काहीही ठरलेलं नव्हतं असं बासित म्हणाले.   २०१५…

Read More Read More

रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ? ।।। आज २०१६ सालचा एप्रिल उजाडतोय. एक वर्षं झालं. एप्रिल २०१५ साली विकत घ्यायचं ठरलेल्या  ३६ लढाऊ रफाएल विमानांच्या  खरेदीचा करारही झालेला नाही, विमानं येण्याचं राहू द्या. १५ एप्रिल २०१५ रोजी फ्रान्सच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील  विमानं तयार स्थितीत भारताच्या ताब्यात येतील अशी घोषणा केली. दौऱ्यात त्यांच्या सोबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर होते.   रफाएल विमानांचा एकूण लोचाच दिसतोय. २००० साली भारतीय हवाई दलातली मिग-२१ जातीची  विमानं म्हातारी झाली होती, अपघात होत होते. त्यांच्या…

Read More Read More

‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो? व्हेलबेक या फ्रेंच कादंबरीकारानं तशी कल्पना करून फ्रेंच समाज कसा बदलू शकतो याचं वर्णन सबमिशन या कादंबरीत लिहिलंय. २०१५ शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या संपादकांना आयसिसच्या जिहादींनी पॅरिसमधे ठार मारलं त्याच दिवशी ही कादंबरी  फ्रेंचमधे प्रसिद्ध झाली. आता या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालंय. ।।  व्हेलबेकच्या कादंबरीचा काळ आहे, २०२०. त्या वर्षी फ्रान्समधे सार्वत्रिक निवडणुका होतात. चार पक्ष निवडणुकीत उभे असतात. कोणालाच बहुमत मिळत नाही. पक्षांमधली फूट वापरून, पक्षांच्या आपसातल्या मारामारीचा उपयोग करून मुस्लीम…

Read More Read More

कामसूत्र.

कामसूत्र.

 कामसूत्र. जगाला भारताचं सांस्कृतीक योगदान. THE MARE’S TRAP, NATURE AND CULTURE IN KAMSUTRA हे वेंडी डॉनिजर यांचं पुस्तक  २०१५ मधे प्रसिद्ध झालं आहे. अर्थशास्त्र हा कौटिल्याचा ग्रंथ अभ्यासल्यानंतर कामसुत्राचे नव्याने समजलेले संदर्भ लेखिकेनं या पुस्तकात मांडले आहेत. वात्स्यायनाचं कामसूत्र इसवी तिसऱ्या शतकात पाटलीपुत्रमधे (पाटणा) प्रसिद्ध झालं. तेराव्या शतकात यशोधरानं कामसूत्रावर ‘जयमंगल’ ग्रंथातून भाष्य केलं. १८८३ साली रिचर्ड बर्टननं कामसूत्राचं इंग्रजीतलं भाषांतर लंडन आणि बनारसमधे प्रसिद्ध केलं. त्यानंतरचं डॉनिजरांचं हे पुस्तक.    इसवी पू. २ मनु – धर्मशास्त्र-मनुस्मृती इसवी १ कौटिल्य…

Read More Read More

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.  ।। सलमान तासिर या राज्यपालांना मुमताझ काद्री या त्यांच्याच अंगरक्षकानं गोळ्या घालून ठार मारलं. त्या बद्दल काद्री याला पाकिस्तानी न्यायालयानं फाशी दिली. पण पाकिस्तानी जनतेला फाशी मंजूर नाही, त्यानं धर्मकर्तव्य केलं असं तिथल्या लोकांना वाटतं. ।। मुमताझ काद्री या माणसाला १ मार्चच्या पहाटे इस्लामाबाद तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार. सलमान तासिर या पाकिस्तानच्या राज्यपालाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा त्यानं केला होता. काद्री तासिर यांचा शरीररक्षक होता.   पाकिस्तानभर या फाशीविरोधात तीव्र प्रतिक्रिया…

Read More Read More

स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

‘स्पॉटलाईट’ ला सर्वोत्तम चित्रपट आणि पटकथा अशी दोन ऑस्करं मिळाली. गेली सातेक वर्षं हा पट  घडत होता. हॉलिवूडमधले पैसेवाले, स्टुडियोंचे मालक या पटात पैसे घालायला तयार नव्हते. मोठमोठे स्टार्स, त्याना अगडबंब पैसे, चित्रीकरणावर भरमसाठ पैसे, वितरणावर भरमसाठ पैसे, जाहिरातबाजीवर पैसे. हे हॉलिवुडचं वैशिष्ट्यं झालंय. या जाचक चौकटीत राहूनही चांगले चित्रपट निघत असतात. (स्पीलबर्ग, स्कॉरसेसे इ).  आशयघन ‘स्पॉटलाईट’ काढणं हॉलिवूडमधे जवळजवळ अशक्य झालंय. स्पॉटलाईटच्या लोकांनी कष्ट करून ते जमवलं. जाहिरात आणि पैसे पाठीशी नसल्यानं या चित्रपटाची वाच्यता झाली नव्हती. ऑस्कर मिळाल्यानंतर…

Read More Read More

ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.

ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.

स्पॉटलाईट हा चित्रपट यंदाच्या ऑस्करसाठी नामांकित झाला आहे. दिद्गर्शन, उत्तम चित्रपट यासह एकूण ७ नामांकनं या चित्रपटाला मिळाली आहेत. या चित्रपटाबद्ल बोंब दोन कारणांसाठी  झाली. एक म्हणजे चर्चमधल्या गैरव्यवहारावर चित्रपटानं बोट ठेवलं. दुसरं म्हणजे अमेरिकन समाज कसा पक्षपाती असतो ते या चित्रपटानं दाखवलं. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणून ही निर्मिती उत्तम आहे हा स्वतंत्र भाग झाला. हा चित्रपट बिशपांची विकृती उघडी करतो. बॉस्टन या अमेरिकन नगरीत अनेक बिशप लहान मुलांचा लैंगिक विकृत वापर करत असत. बिशप लहान मुलांना देवाची भीती घालून…

Read More Read More