दहशतवादाचा मुकाबला. सक्षम यंत्रणा नव्यानं उभारावी लागेल
आधीच्या ब्लॉगमधे भारत सरकार आणि पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट दहशतवादाचा मुकाबला करण्यात कां अपेशी ठरते ते लिहिलं होतं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं, भारत सरकारचे विविध विभाग दहशतवादाच्या मुळाचा छडा लावत नाहीत, तशी यंत्रणा भारत सरकारजवळ नाही असं त्या ब्लॉगमधे लिहिलं होतं. स्वातंत्र्यापासून तर १९९० पर्यंत पाकिस्तान सरकार लष्कराचा वापर करून भारताशी लढत होतं. १९९० नंतर पाकिस्ताननं जैशे महंमद, लष्करे तय्यबा यासारख्या खाजगी टोळ्या तयार केल्या, त्याना शस्त्रं दिली, प्रशिक्षण दिलं, पैसे दिले. काश्मिरात आणि भारतात त्या दहशतवादी टोळ्या पाठवायला…