मुस्लीम समाजासमोरचं आव्हान
पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यांनतर ब्रीटनमधल्या मुसलमानांचा अपमान करण्याच्या घटना वाढल्या आहेत. बुरखा घातलेल्या स्त्रीला बसमधे, भुयारी रेलवेत, मेट्रोत शिव्या दिल्या जातात. माणूस मुसलमान आहे असं त्याच्या कपड्यांवरून किंवा दाढीवरून कळलं की दहशतवादी, स्कम, इत्यादी शेलक्या शिव्या दिल्या जातात. सार्वजनिक ठिकाणी त्यांना फिरणं कठीण करून टाकलं जातं. अकरा सप्टेंबरच्या न्यू यॉर्क टॉवर घटनेनंतर मुसलमान आणि शिखांना ब्रीटनमधे धोपटण्यात आलं. २०१३ साली वुलिचमधे एका ब्रिटीश सैनिकाला मुसलमान अतिरेक्यांनी ठार मारलं तेव्हांही मुसलमानांना मारहाण, अपमानास्पद वागणुक देण्याच्या घटना वाढल्या होत्या.मुसलमान अतिरेक्यांनी जगात कुठंही धांदल…