ट्रंपनी काय मिळवलं
ट्रंपनी काय मिळवलं? डोनल्ड ट्रंप दोन दिवस चीनमधे राहिले, सी जिनपिंग यांच्याशी बोलले. सतत जिनपिंगची खुशामद करत होते.जिनपिंग गंभीर होते. फार तर दहा वाक्यं बोलले असतील. दोनेक तास दोघं एकांतात होते. तिथं काय ठरलं ते कळायला मार्ग नाही. खाजगी चर्चेत काय बोलणं झालं ते जिनपिंग जाहीर करत नाहीत. मागं एकदा कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी खाजगी बोलण्यातल्या काही गोष्टी पत्रकारांना सांगितल्या. जिनपिंग वैतागले. त्यांनी ट्रुडोना खाजगीतच झापलं, पुन्हा तुमच्याशी बोलणार नाही असं सांगून टाकलं. तैवाननं स्वतंत्र होण्याच्या गोष्टी करू नयेत, दूरवर…