ट्रंप जिनपिंग कसे वावरतात?
सी जिनपिंग आणि डोनल्ड ट्रंप एका विशाल उद्यानात बसले होते. डाव्या सोफ्यावर ट्रंप, समोरच्या सोफ्यावर जिनपिंग. ट्रंप गुडघ्यावर दुसरा पाय दुमडून काहीसे वाकून जिनपिंग यांच्याशी बोलत होते. जिनपिंग सोफ्याच्या पाठीवर दोन्ही हात ताणून बसले होते. ट्रंप काही तरी महत्वाचा मुद्दा जिनपिंगना सांगत होते. जिनपिंग अगदी आरामात,रिलॅक्स मूडमधे ‘हं, सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते…’ अशा आविर्भावात होते. जिनपिंग ट्रंपपासून अंतर राखून होते. शरीरानं आणि मनानंही. ट्रंपचा चेहरा काहीसा ताणलेला होता. जिनपिंग यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या, कोणतीही भावना त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. असाच…