कामसूत्र.
कामसूत्र. जगाला भारताचं सांस्कृतीक योगदान. THE MARE’S TRAP, NATURE AND CULTURE IN KAMSUTRA हे वेंडी डॉनिजर यांचं पुस्तक २०१५ मधे प्रसिद्ध झालं आहे. अर्थशास्त्र हा कौटिल्याचा ग्रंथ अभ्यासल्यानंतर कामसुत्राचे नव्याने समजलेले संदर्भ लेखिकेनं या पुस्तकात मांडले आहेत. वात्स्यायनाचं कामसूत्र इसवी तिसऱ्या शतकात पाटलीपुत्रमधे (पाटणा) प्रसिद्ध झालं. तेराव्या शतकात यशोधरानं कामसूत्रावर ‘जयमंगल’ ग्रंथातून भाष्य केलं. १८८३ साली रिचर्ड बर्टननं कामसूत्राचं इंग्रजीतलं भाषांतर लंडन आणि बनारसमधे प्रसिद्ध केलं. त्यानंतरचं डॉनिजरांचं हे पुस्तक. इसवी पू. २ मनु – धर्मशास्त्र-मनुस्मृती इसवी १ कौटिल्य…