आयसिस उत्तरार्ध
१९२६ साली केमाल पाशानं ऑटोमन खिलाफत बरखास्त केली. त्यानं अधिकृतरित्या राज्य – स्टेट- शरियापासून आणि कुराणापासून मुक्त केलं. अल बगदादी आणि आयसिसला पुन्हा एकदा खिलाफत म्हणजे सर्वंकष धर्मराज्य प्रस्थापित करायचं आहे. आधुनिकता आणि आधुनिक समाज न समजलेल्या इस्लामी लोकांना खिलाफत या कल्पनेचं फार आकर्षण आहे. इस्लामचं राज्य असलेल्या पाकिस्तान किवा सौदी अरेबियात इस्लामी माणसं सुखी नाहीत. इस्लामी राज्य नसलेले अमेरिका, युरोप, भारत इत्यादी देशात मुसलमान सुखानं जगत आहेत. असं असूनही काही मुसलमानांना वाटतं की त्यांची काल्पनिक दुःखं खिलाफत स्थापन…