पुस्तकं/मंगळावर वस्ती
City on Mars. Kelly Weinersmith, Zach Weinersmith. \\ मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे ३७.६ कोटी किमी अंतरावर आहे. मंगळावर पाणी आहे. मंगळावर हवा आहे. मंगळावरचं तपमान माणूस जगू शकेल इतकं आहे. थोडक्यात असं की खटपट केली तर माणूस मंगळावर वस्ती करू शकेल. शिवाय मंगळावर सिलिकॉन व अन्य माणसाच्या उपयोगाची अनेक खनिजं आहेत. मंगळाबद्दल माणसाच्या अनेक कल्पना होत्या. कालपरवापर्यंत मंगळाचं वास्तव माणसाला माहित नव्हतं. तो आकाशात दिसायचा येवढंच. दुर्बिणीचा शोध लागल्यावर तो अधिक जवळून दिसू लागला. माणसानं मंगळाबद्दल काही कल्पना करून…