Browsed by
Month: September 2023

सिनेमा. ॲस्टरॉईड सिटी. पूर्णपणे कल्पित तरीही खऱ्या कथानकाचा विक्षिप्त धमाल चित्रपट

सिनेमा. ॲस्टरॉईड सिटी. पूर्णपणे कल्पित तरीही खऱ्या कथानकाचा विक्षिप्त धमाल चित्रपट

कॅन महोत्सवात वेस अँडरसनचा ॲस्टरॉईड सिटी सादर झाला. अँडरसनचा हा बारावा चित्रपट. अँडरसनच्या चित्रपटांचं खूप कौतुक होतं, चर्चा होते, कधी कधी नामांकनंही मिळतात पण ऑस्कर लाभत नाही. यु ट्यूबवर अँडरसनच्या चित्रपटाबद्दल खूप बोललं जातं, तो चित्रपट कसे करतो यावर व्हिडियो असतात. आपण त्याचे चित्रपट चारचार वेळा पाहिलेत असं सांगणारे तरूण ट्यूबवर व्हिडियो टाकतात. अनेकांचं तसं मत असतं. कारण त्याचे चित्रपट सरळ नसतात, सरळ रेषेत सरकणारे नसतात, कळायला कठीण असतात. वरवर विनोदी आणि विक्षिप्त वाटतात, पण त्या विक्षिप्तपणाच्या थराखाली अनेक गंभीर…

Read More Read More

कॅनडा-भारत- शिख. काय लोचा झालाय?

कॅनडा-भारत- शिख. काय लोचा झालाय?

  १८ जून २०२३. कॅनडाचे नागरीक हरदीप सिंग निज्जर (४७) व्हँकुव्हरमधल्या गुरुद्वारातून बाहेर पडले. ते या गुरुद्वाराचे प्रेसिडेंट होते. खालिस्तानचे समर्थक होते. या गुरुद्वारात खालिस्तान समर्थकांची मोठी संख्या आहे. कॅनडाच्या पोलिसांनी निज्जरना त्यांचा खून करण्याचा प्रयत्न होणार आहे असं सांगितलं होतं, सुरक्षेची व्यवस्था ठेवा असं सांगितलं होतं. निज्जरनी दुर्लक्ष केलं होतं. गुरुद्वाराच्या कंपाऊंडमधे त्यांची कार  होती. निज्जरनी कारमधे बसून आपल्या मुलाला फोन करून सांगितलं की आपण लवकरच घरी पोचतोय. सीटमधे स्थिर होत होते. कंपाऊंडमधे उभी असलेली एक कार सुरु झाली…

Read More Read More

रविवारचा लेख राजपुत्र, वेटरचं काम करतोय

रविवारचा लेख राजपुत्र, वेटरचं काम करतोय

 तुमच्या पायाला भिंगरी असेल आणि तुम्ही मळलेल्या वाटा टाळून भटकणारे असाल; तर एकादे वेळेस स्पेनच्या ईशान्य भागातल्या LA BISBAL D’EMPORDÀ या गावात जाल. हे गाव फ्रान्सच्या हद्दीजवळ आहे. गावाची वस्ती सुमारे १० हजार आहे.या गावाला माद्रीद, बार्सेलोना या शहरांसारखी कीर्ती नाही, पर्यटक तिथं जात नाहीत.   तिथं El Drac या बारमधे तुम्हाला एक मिस्टर सोला नावाचा वेटर भेटेल. आदबीनं तो तुम्ही मागवलेली वाईन किंवा व्हिस्की तुमच्या टेबलावर आणून ठेवेल. कुठल्याही वेटर सारखा वेटर. काउंटवरचा माणूस हळूच सांगेल की तुम्हाला ज्यानं…

Read More Read More

पुस्तक पोलीस खात्याची पुनर्रचना व्हायला हवी

पुस्तक पोलीस खात्याची पुनर्रचना व्हायला हवी

Keeping India Safe Vappala Balchandran Harper Collins 328 Pages. Rs. 335 kindle {} प्रस्तुत पुस्तकाची पहिली आवृत्ती २०१७ साली प्रसिद्ध झालीय. पण आजच्या परिस्थितीत ते पुस्तक वाचनीय झालं आहे. भारतीय पोलिस सेवेतले (आयपीएस) अधिकारी वप्पाला बालचंद्रन यांनी हे पुस्तक लिहिलंय. ते केंद्रीय कॅबिनेटचे सल्लागार होते आणि मुंबईवरच्या दहशतवादी हल्याच्या चौकशी समितीचे सदस्य होते. ते इंटेलिजन्स विभागामधे होते. त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे.  भारतात सुरक्षेबाबत नीट विचार झालेला नाही, सुरक्षेसाठी आवश्यक संस्थात्मक रचना झालेली नाही.  भारतातली पोलीस व्यवस्था अकार्यक्षम आहे. ऐन…

Read More Read More

रविवारचा लेख जी २०-गुऱ्हाळ. शब्दांचाच गूळ, शब्दांचीच ढेप.

रविवारचा लेख जी २०-गुऱ्हाळ. शब्दांचाच गूळ, शब्दांचीच ढेप.

९ आणि १० सप्टेंबरला जी २० परिषदेचं भारताच्या अध्यक्षतेचं वर्ष समाप्त झालं, त्या दिवशी एक शिखर परिषद दिल्लीत पार पडली. गेल्या वर्षी इंडोनेशियाकडं अध्यक्षपद होतं, पुढल्या वर्षी ब्राझीलकडं अध्यक्षपद असेल. युरोपियन युनियनसह इतर १९ देश या गटाचे सदस्य आहेत, यंदा द. आफ्रिका या नव्या देशाला या गटात घेण्यात आल्यानं आता जी २१ असं तिचं नामकरण होईल. मोठ्ठे जीडीपी ही गटाची मुख्य कसोटी आहे. त्यामुळंच अमेरिका, रशिया, चीन इत्यादी देश या गटात आहेत. जी २०० ही युनायटेड नेशन्स, विश्वबँक, विश्व नाणेनिधी…

Read More Read More

सिनेमा. पाठलाग शैली चित्रपटात आणणारा दिक्दर्शक, फ्रीडकिन.

सिनेमा. पाठलाग शैली चित्रपटात आणणारा दिक्दर्शक, फ्रीडकिन.

फ्रेंच कनेक्शन या ऑस्कर विजेत्या दिक्दर्शकाचा, विल्यम फ्रीडकिन यांचा, ७ ऑगस्टला मृत्यू झाला. फ्रीडकिन स्वतःला व्यावसायिक दिक्दर्शक-निर्माते मानत. मृत्यूपूर्वी काही दिवसच आधी त्यांनी The Caine Mutiny Court-Martial हा चित्रपट पूर्ण केला होता. त्या वेळी, म्हणजे मरणाच्या वेळी त्यांचं वय होतं ८७.  फ्रीडकिन यांनी २० फीचर फिल्म्स आणि ७ डॉक्युमेंटरी केल्या. त्यांनी टीव्हीसाठी ६ मालिका आणि ४ फिल्म्स केल्या. ऑपेरा या नाट्य प्रकारात त्यांना रस होता, त्यांनी ११ ऑपेरा केले. फ्रीडकिन प्रसिद्ध झाले ते त्यांच्या फ्रेंच कनेक्शन या चित्रपटामुळं. १९७१ साली…

Read More Read More

रविवारचा लेख निवडून येणारा हुकूमशहा

रविवारचा लेख निवडून येणारा हुकूमशहा

लोकशाहीच्या वाटेनं हुकूमशहा होणाऱ्या पुढाऱ्यांच्या मांदियाळीत आता एका नव्या माणसाची भर पडतेय.  आफ्रिकेच्या उत्तरेतला, भूमध्य समुद्राच्या काठावरच्या ट्युनिशियाचे प्रेसिडेंट कैस सईद. देशाचं कल्याण कशात आहे (देशाचं याचा अर्थ सईद यांचं) हे सईद ठरवतात आणि देशानं त्यांच्या ‘हो’ला ‘हो’ करायचं. ते म्हणतील की त्यांच्या आज्ञेवरून सूर्य पश्चिमेला उगवतो. जनतेनं होकार भरायचा. त्यांचा ताजा विचार असा. ट्युनिशिया या देशाची वाट देशातल्या काळ्यां लावलीय. महागाई वाढलीय, काळे जबाबदार. जीवनावश्यक वस्तू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्यात, देशात बेकारी वाढलीय, काळे जबाबदार. आमचा देश अरब आहे….

Read More Read More

पुस्तक. कादंबरी. लेखक – कंप्यूटर

पुस्तक. कादंबरी. लेखक – कंप्यूटर

स्टीफन मार्च या लेखकाची डेथ ऑफ ॲन ऑथर ही कादंबरी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. कादंबरी १२० पानांची आहे. रहस्यकथा किंवा थरारकथा आहे. ती गाजतेय कारण ती एआयचा वापर करून लिहिली आहे. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे कंप्युटर या यंत्राची बुद्धी.   लेखकानं तीन ॲप्सचा वापर करून ही कादंबरी लिहीलीय. पहिल्या टप्प्यावर लेखकाला अभिप्रेत असलेल्या कथानकाची चौकट यंत्राला सांगितली गेली. कथानकातले टप्पे लेखकानं सांगितले. यंत्राने ते दिले.    दुसऱ्या ॲपनं  कथानकाचा सूर, लांबी आणि शैली सुचवली. तिसऱ्या ॲपनं भाषेतल्या सुधारणा सुचवल्या…

Read More Read More

रविवारचा लेख. पेन्सिलवाला.

रविवारचा लेख. पेन्सिलवाला.

 पेन्सिली जमवणारा माणूस अमेरिकेत आयोवा राज्यात कोलफॅक्स नावाचं एक गाव आहे. लोकसंख्या असेल दोनहजार बावीसशेच्या आसपास. येवढंसं ते गाव. त्यात एक कोलफॅक्स म्युझियम आहे.     गिनेस बुक ऑफ रेकॉर्डची दोन माणसं  गावातल्या म्युझियममधे पोचली. गावातले एक नागरीक एरन बार्थोल्मी (Aaron Bartholmey) यांनी जमवलेल्या पेन्सिली त्यांना पहायच्या होत्या, मोजायच्या होता.  पेन्सिली साठवण्याचा उच्चांक बार्थोल्मी मोडताहेत का याची तपासणी त्यांना करायची होती. बार्थोल्मीनं घरात जमवलेल्या पेन्सिली ७५० खोक्यांत भरल्या आणि आपल्या कारच्या अनेक फेऱ्या करून  म्युझियममधे नेऊन ठेवल्या. पेन्सिली मोजणीसाठी अख्खं…

Read More Read More

सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर

सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर

सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर ओपनहायमरच्या ॲटम बाँबवर सिनेमा करायचं १९४५ साली आल्फ्रेड हिचकॉकच्या डोक्यात होतं. हिचकॉकच्या कानावर होतं की न्यू मेक्सिकोमधे अमेरिकन लष्करानं कसला तरी सॉलिड प्रोजेक्ट उभारलाय आणि त्यात ॲटम बाँब तयार करत आहेत. एका लेखक मित्रानं हिचकॉकला सांगितलं की तो प्रोजेक्ट इतका गुप्त आहे की कोणी एकदा का आत गेला की बाहेर येत नाही. हिचकॉक या बाबत एका वैज्ञानिकाला भेटला, बाँबची चौकशी केली. वैज्ञानिक म्हणाला ‘कसलं काय बाँबचं घेऊन बसलात. अणूचा स्फोट करणं वगैरे गोष्ट शक्यच नाहीये…’…

Read More Read More