Browsed by
Month: May 2020

स्थलांतरीत आणि स्थलांतरीत नसलेले, सर्वानाच जगण्यासाठी नवी व्यवस्था उभारावी लागेल.

स्थलांतरीत आणि स्थलांतरीत नसलेले, सर्वानाच जगण्यासाठी नवी व्यवस्था उभारावी लागेल.

मुंबईतल्या धारावीतल्या हज्जारो अधांतरी लोकांनी रस्त्यावर रांगा लावल्या, बसमधे बसण्यासाठी.  बस जाणार होती रेलवेच्या डब्यापर्यंत, रेलवेचा डबा जाणार होता त्यांच्या बिहार, उत्तर प्रदेश, ओदिसा, बंगालमधल्या गावापर्यंत. मुंबईत इतर ठिकाणीही माणसं रेलवे स्टेशनांत गेली, मुंबई सोडण्यासाठी. यांची संख्या काही लाख. ही माणसं दहा बाय दहाच्या घरात रहात, दहा बाय दहाच्या खोलीत खाद्यपदार्थ किंवा प्लास्टिक किंवा चामड्यांच्या वस्तूंचं उत्पादन करत. यांचं दाटीवाटीचं जगणं अत्यंत म्हणजे अत्यंत अनारोग्यकारक होतं.  लातूरमधले डाळ मिल, तेल एक्स्ट्रॅक्शन प्लॅंट इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या  सुमारे १० हजार मजुरांनी…

Read More Read More

मुख्यमंत्रीपद हुकलं

मुख्यमंत्रीपद हुकलं

फडणवीस दोनेक तास वर्षाच्या हिरवळीवर येरझारा घालत होते. थांबेचनात.  त्यांच्या पुढं मागं करणारे कमांडोही दमले.  जेवायची वेळ टळून गेली म्हणून अमृता वहिनी देवेंद्रना शोधत होत्या तर त्यांना देवेंद्र हिरवळीवर फेऱ्या मारताना दिसले. अमृतावहिनीही देवेंद्रांबरोबर फेऱ्या मारू लागल्या. “ आता थांबा, जेवून घ्या, पोट कमी करण्यासाठी इतका अघोरी उपाय करणं बरोबर नाही.” देवेंद्र ऐकायला तयार नाहीत. वहिनींबरोबर साताठ फेऱ्या झाल्या. वहिनी जायला तयार नाहीत म्हटल्यावर धापा टाकत देवेंद्र म्हणाले, “ तुला समजत कसं नाहीये. तिकडं शरद पवारांनी कट रचलाय. ते उद्धव…

Read More Read More

मुख्य पात्र कधीच दिसत नाही असा चित्रपट.

मुख्य पात्र कधीच दिसत नाही असा चित्रपट.

दी वाॅर्डन चित्रपटाला इंग्रजी सब टायटल नाही. चित्रपट इराणी. माणसं काय बोलतात ते कळायला मार्ग नाही. जे पडद्यावर दिसतं तेवढंच पाहून अंदाज बांधायचा. म्हणजे मूकपटच पहायचा म्हणायचं. या सिनेमाबद्दल मी काहीच वाचलं नव्हतं. अगदी कोरा करकरीत होतो. निखिलेश चित्रे या मित्रानं चित्रपट चांगला आहे असं लिहिलं होतं म्हणूनच पहायला घेतला. सुरवात होते कुंद वातावरणात पावसात तुरुंगाच्या एका दालनात. फाशीचा फलाट मोडला जात असतो, फाशीचा दोर ज्या खांबाला लटकत असतो तो खांब काढायच्या बेतात काही तुरूंग कर्मचारी असतात. एक मेजर दर्जाचा…

Read More Read More

मोदींच्या जाकिटाचं बटण तुटतं तेव्हां…

मोदींच्या जाकिटाचं बटण तुटतं तेव्हां…

लोककल्याण मार्गावरच्या सात नंबरच्या बंगल्यातल्या कार्यालयात नरेंद्र मोदी बसले होते. समोर चार अधिकारी फायली घेऊन उभे होते. खूप अंतरावर. दूरदर्शनची माणसं मोदींचं भाषण रेकॉर्ड करण्याची तयारी करत होते. कॅमेरा सेट झाला होता.  दूरदर्शनचा अधिकारी आणि रेकॉर्डिंग करणारे कर्मचारी कुजबुजत होते, सारं काही ठीक आहे ना याची तपासणी करत होते. मोदी सरांनी मान्यता दिली की रेकॉर्डिंग सुरु व्हायचं होतं.   स्क्रिप्ट तयार झालं होतं. मोदी लॉक डाऊन १४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करणार होते. अर्थात हे फक्त स्क्रिप्ट तयार करणाऱ्या…

Read More Read More

संकट काळ

संकट काळ

क्राऊन या मालिकेतला एपिसोड सुरू होतो तेव्हा ॲबरफॅन गावात शुक्रवार असतो, मुसळधार पाऊस पडत असतो. शाळा सुटणार असते, एक शिक्षक मुलांना पुस्तिका वाटतात, त्यातलं गाणं पाठ करा, उद्या ते सर्वांनी एकत्र गायचंय असं सांगतात. दोन तीन दृश्यं मधे जातात, मुलं शाळेत पोचतात. एक विद्यार्थी वात्रट असतो. हाॅलमधे जायच्या आधीच वर्गात तो ते गाणं म्हणतो. वर्ग हसतो. शिक्षक सांगतात की गाणं म्हणायला वेळ आहे, पाच मिनिटं आहेत. वर्गाच्या खिडकीतून दूरवरचा डोंगर दिसत असतो. डोंगर म्हणजे कोळसा खाणीतून बाहेर आलेल्या मातीचा डोंगर….

Read More Read More