Browsed by
Month: November 2019

जेएनयू विद्यार्थ्यांचं आंदोलन

जेएनयू विद्यार्थ्यांचं आंदोलन

जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीचे विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात लढाई जुंपली आहे. फीवाढ आणि विद्यार्थ्यानं परिसरात कसं वागायचं हे दोन मुद्दे धसाला लागले आहेत. ही लढाई सध्या तरी एक विश्वशाळा आणि ती चालवणारं सरकार यांच्यातली आहे. लढाईत अर्थातच त्या पलिकडचेही अधिक व्यापक मुद्दे गुंतलेले आहेत. त्यामधे भारताचं आजचं शैक्षणीक आणि आर्थिक वास्तव गुंतलेलं आहे. त्यामधे हिंदुत्ववादी विचारांपेक्षा वेगळे विचार देशातून उखडून टाकायचे हा हिंदुत्ववादी विचार गुंतलेला आहे. १९६९ साली न्या. छागला यांच्या पुढाकारानं जेएनयू निर्माण झाली. पुरोगामी विचार, समाजवाद या विषयांचा अभ्यास…

Read More Read More

कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक

कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक

रिसर्ड कापुस्किनस्की हे एक पोलिश पत्रकार लेखक होते. १९५६ ते १९८१ या काळात कापुश्चिन्सकी आफ्रिका आणि आशियातल्या २७  देशात फिरले, तिथल्या राजकीय उलथापालथीच्या बातम्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यासाठी त्यांना ४० वेळा तुरुंगवास पत्करावा लागला, चार वेळा त्यांना फाशी सुनावली गेली, जिवावर बेतल्याच्या घटनांची तर मोजदादच नाही. पत्रकारी आणि साहित्य यांच्या सीमेवरचं त्यांचं लिखाण त्यांच्या गोष्टीरूप शैलीसाठी प्रसिद्ध आहे. मुळात त्यांचं लिखाण पोलिश भाषेत होतं.  १९७८ साली अनदर डे ऑफ लाईफ हे अंगोलातल्या युद्धावरचं त्यांचं इंग्रजीत भाषांतर झालेलं पहिलं पुस्तक होतं….

Read More Read More

अल बगदादी मेला?

अल बगदादी मेला?

अमेरिकन सैन्यानं कोंडी केल्यानंतर अबु बकर अल बगदादीनं स्वतःच्या अंगावर बाळगलेल्या स्फोटक बंडीचा स्फोट करून स्वतःला संपवलं. सीरियात इडलिब या प्रांतात ही घटना घडली. सहाएक महिने अल बगदादीच्या हालचालीवर पाळत ठेवल्यानंतर बगदादीचा ठावठिकाणा सापडला. बगदादीचे डीएनए सँपल अमेरिकन सैनिकानी जवळ ठेवले होते. बगदादी जिवंत सापडणार नाही हे माहित असल्यानं मेलेला माणूस बगदादीच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे नमुने उपयोगी पडले. ओसामा बिन लादेनप्रमाणंच बगदादीच्या शरीराचे तुकडे दफन करण्यात आले किंवा जाळण्यात आले, पण कुठे ते अमेरिकनं गुप्त ठेवलं, कारण त्याचं…

Read More Read More

बस, सत्ता हवीय.

बस, सत्ता हवीय.

 सत्तेची इतकी हाव? भाजप आणि शिवसेनेनं २०१९ च्या निवडणुका युती करून लढवल्या. भाजपला १०५ जागा आणि सेनेला ५६ जागा मिळाल्या. २८८ जागांच्या विधानसभेत १४५ जागा मिळाल्या की सरकार तयार करता येतं, भाजप-सेना युतीला १६१ जागा मिळाल्या. २४ ऑक्टोबर रोजी निकाल लागले तरीही ८ नोव्हेंबरपर्यंत भाजप-सेनेला सरकार स्थापन करता आलं नाही. भाजप आणि सेनेत धोरण आणि कार्यक्रमाबाबत मतभेद नाहीत. दोन्ही पक्षांची युती २५ वर्षापेक्षा अधिक काळ आहे, दोन वेळा त्यांनी एकत्रितपणे सरकार चालवलं आहे. तरीही सरकार होत नाहीये. कारण काय? मतभेद…

Read More Read More

दिवाळी अंकांतली चार मोठी माणसं.

दिवाळी अंकांतली चार मोठी माणसं.

यंदाच्या दिवाळी अंकात माणसाला समृद्ध करणाऱ्या चार माणसांची प्रोफाईल्स आहेत. परिवर्तनाचा वाटसरू या अंकात नोम चॉम्सकी आहेत. चॉम्सकीनी आता नव्वदीत प्रवेश केला आहे.  त्यांनी भाषा या विषयावर संशोधन केलं आहे. भाषा आत्मसात करण्याची क्षमता माणसाच्या मेंदूत जन्मतः असते, मूल परिसरातून मिळणाऱ्या अनुभवातून भाषेचं सोयिस्कर व्याकरण शिकतं, जीवसृष्टीत माणूस या एकाच जीवाकडं भाषा नावाची गोष्ट आहे, हा चॉम्सकी यांचा सिद्धांत. हा सिद्धांत त्यांनी राजकारणात सर्व माणसं मूलतः सारखीच असतात हे सांगण्यासाठीही वापरला. चॉम्सकी गाजले आणि आजही चर्चेत असतात ते त्यांच्या राजकीय…

Read More Read More