Browsed by
Month: June 2023

पुस्तक.   हिटलरची तळी उचलून धरणारे पेपर सम्राट .

पुस्तक.   हिटलरची तळी उचलून धरणारे पेपर सम्राट .

The Newspaper Axis: Six Press Barons Who Enabled Hitler  ❖ शीर्षकातच पुस्तकाचा विषय आहे. ब्रीटन आणि अमेरिकेतले हिटलरला समर्थ करणारे सहा पेपर सम्राट. हिटरलचा उदय झाला तेव्हांपासून ब्रीटन आणि अमेरिकेतल्या बलाढ्य आणि अमेरिकन नागरिकांचं मत तयार करणाऱ्या सहा मालकांनी हिटलरचं कौतुक केलं. त्याच्यामुळं जर्मनीचा विकास झाला, जर्मनी श्रीमंत झाला असं या पेपरांनी वाचकांना सांगितलं.उदयापासूनच हिटलरनं ज्यूंना कसं वाईट वागवलं, कम्युनिष्ट व इतर कामगार-गरीबांची बाजू घेणाऱ्यांना कसं वागवलं आणि लोकशाही कशी खतम केली या बाबी या मालकांनी दुर्लक्षिल्या. पहिल्या महायुद्धानंतर व्हर्साय करारात जर्मनीवर…

Read More Read More

सिनेमा. एडवर्ड स्नोडेनवरचा माहितीपट

सिनेमा. एडवर्ड स्नोडेनवरचा माहितीपट

सिनेमा. सिटिझन फोर सरकारची कुलंगडी बाहेर काढणं म्हणजे देशद्रोह. लॉरा पॉइट्रसला निनावी निरोप आला, भेटायचंय. पॉईट्रस सामाजिक प्रश्नांवर माहितीपट करतात. निरोप देणाऱ्यानं आपलं नाव वा ठावठिकाणा सांगितला नाही.  मेसेजेस यायला लागले. मेसेज एनक्रिप्टेड असत. वाचता येत नसत. निरोप पाठवणारा आपण कोण आहे ते सांगत नसे, फोनवर स्वतः बोलायला तयार नसे.  एके दिवशी तो माणूस फोनवर बोलला. नाव सांगितलं नाही. ‘तू माझ्यावर फिल्म करावीस असं मला वाटतं.  सरकार  नागरिकांवर बेकायदा पाळत ठेवतं याला तू विरोध करतेस. त्यामुळं मला वाटलं की मी…

Read More Read More

पुस्तकं. स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे.

पुस्तकं. स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे.

स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे. BROKEN YARD: THE FALL OF THE METROPOLITAN POLICE. TOM HARPER. || ‘यार्ड पोलिस संस्था वांशिक आणि लैंगिक पूर्वग्रहानं ग्रासलेली आहे, भ्रष्ट झाली आहे’ असं स्कॉटलॅंड यार्ड या नामांकित पोलिस यंत्रणेचे प्रमुख लेन लिविंगस्टन म्हणतात. एका पत्रकार परिषदेत नुकतीच त्यांनी वरील कबुली दिली. लंडनची  पोलीस व्यवस्था या विभागाकडं असते. स्कॉटलँड यार्डला मेट पोलिस किंवा मेट्रो पोलिस असंही म्हणतात. १८३० साली स्थापन झालेल्या या पोलिस खात्याचा फार लौकिक झाला, शेरलॉक होम्सनं स्कॉटलँड यार्डला जगाच्या नकाशावर…

Read More Read More

सिनेमा ‘वध’. वध म्हणा की खून म्हणा. चित्रपट पहाण्यासारखा.

सिनेमा ‘वध’. वध म्हणा की खून म्हणा. चित्रपट पहाण्यासारखा.

वध. सध्या थरारपटाचा जमाना आहे. गुन्हा.  कथानक हळूहळू गुन्ह्याकडं सरकतं. गुन्हा होतो. शेवटी गुन्हा कसा आणि का झाला याची उकल. गुन्ह्याची मिनिटं थराराची. अलकडली पलिकडली मिनिटं गुन्ह्याचा तपशील आणि कारणं सांगणारी.   हिचकॉकनं थरारपटाचा फॉर्म्युला दिला. सायको या चित्रपटात एक नॉर्मन आहे. त्यानं त्याच्या आईचा खून केलाय. त्यातून त्याच्या व्यक्तिमत्वात एक गंड तयार झालाय. नॉर्मन कधी त्याची आई होतो कधी नॉर्मन होतो. जेव्हां नॉर्मन एकाद्या स्त्रीकडं आकर्षित होतो तेव्हां त्याच्या व्यक्तिमत्वातली आई जागी होते आणि ती त्या स्त्रीचा खून करते. दुभंग…

Read More Read More

पुस्तकं. चीनला वळण लावणारं पुस्तक. किंमत २७५० डॉलर.

पुस्तकं. चीनला वळण लावणारं पुस्तक. किंमत २७५० डॉलर.

नुकतंच एक पुस्तक चीनमधल्या बाजारात २७५० डॉलर या किमतीला विकलं गेलं. कारण या पुस्तकाच्या फार कमी प्रती उपलब्ध होत्या. पुस्तकाची वाच्यता झाल्यावर लोकं दुकानं आणि पुस्तकालयं धुंडाळू लागले, ते पुस्तक पाहिेजे पुस्तक पाहिजे म्हणू लागले. जसजशी मागणी वाढू लागली तसतशी पुस्तकाची किमत वाढू लागली आणि २७५० डॉलरला त्याच्या प्रती विकल्या गेल्या. पुस्तक ३४९ पानांचं आहे. चीनमधे या पुस्तकाला मागणी आल्याबरोबर अमेरिकन लोकही हे पुस्तक वाचू लागले, पुस्तकाची नव्यानं आवृत्ती निघाली आणि पेपरबॅक प्रत २० डॉलरला दुकानात उपलब्ध झालीय, पुठ्ठा बांधणीची…

Read More Read More