Browsed by
Month: May 2022

क्वाड बैठक. भारतासमोरचा पेच. गटात की स्वतंत्र.

क्वाड बैठक. भारतासमोरचा पेच. गटात की स्वतंत्र.

क्वाड या अनौपचारीक गटाची बैठक जपानमधे पार पडली. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार सदस्य  देशांचे प्रमुख बैठकीत हजर होते.  बैठकीत औपचारीक ठराव मंजूर झाले, देशांच्या प्रमुखांच्या खाजगी बैठका झाल्या,  बैठकांचे औपचारिक वृत्तांत प्रसिद्ध झाले. एकमेका सहाय्य करू (आर्थिक, तंत्रवैज्ञानिक, पर्यावरण हे मुद्दे) असं चारही देश बोलले. खरा मुद्दा होता तो चीनला वेसण घालण्याचा. खरं म्हणजे चीनवर अंकुष ठेवण्यासाठीच हा गट स्थापन झाला आहे. चीन आशियात हातपाय पसरतो आहे. भारत आणि लंका या चीनच्या बाजारपेठा आहेत, तिथं चीनची खूप गुंतवणूक आहे. ऑस्ट्रेलियातून…

Read More Read More

गोऱ्या तरूणानं १० काळ्यांना कां ठार केलं?

गोऱ्या तरूणानं १० काळ्यांना कां ठार केलं?

पेटन जेंड्रन. वय वर्षे १७.  दोनशे मैलांचा प्रवास करून १३ मे रोजी बफेलो या गावात पोचला. टॉप्स या वाणसामानाच्या दुकानात जाऊन त्यानं रेकी केली. किती माणसं येतात, कसकशी येतात, गाड्या कुठं थांबवतात वगैरे. १४ मे रोजी दुपारी २.५ च्या सुमाराला तो टॉप्स दुकानाशी पोचला. त्यानं अंगावर लष्करी कपडे घातले होते आणि बुलेट प्रूफ जॅकेटही घातलं होतं. त्याच्याकडलं एक पिस्तूल आणि एक गन त्यानं गाडीतच ठेवली. बुशमास्टर ही सेमी ऑटोमॅटिक गन हातात घेतली. दुकानाच्या बाहेरच त्यानं गोळीबाराला सुरवात केली. दुकानात घुसून…

Read More Read More

आणखी एक खोटारडा राष्ट्रपती झालाय, फिलिपिन्समधे.

आणखी एक खोटारडा राष्ट्रपती झालाय, फिलिपिन्समधे.

१९८६ साली फर्डिनंड मार्कोस, त्या वेळेचे फिलिपिन्सचे अध्यक्ष, देश सोडून हवाई बेटांत पळून गेले. कारण त्यांनी केलेला घोर भ्रष्टाचार उघड झाला होता, जनता रस्त्यावर उतरली होती, पोलिसही   त्यांचं लोकांच्या रागापासून संरक्षण करू शकत नव्हते. पळून जाताना मार्कोस पंचवीस रांजण भरून सोनं आणि पंचवीस खोके भरून रोख रक्कम बरोबर नेली होती. पळून जाताना त्यांचा मुलगा बाँगबाँग मार्कोस त्यांच्या सोबत होता. मार्कोसनी सत्ता सोडल्यावर त्यांचा रहाता राजवाडा लोकाना पहायला मिळाला. घरातल्या नळाच्या तोट्या, दिव्याची बटणं, दरवाजांच्या कड्या, बाथ टब इत्यादी साऱ्या गोष्टी सोन्याच्या…

Read More Read More

जहांगीरपुरी आणि खरगोन. बुलडोझर.

जहांगीरपुरी आणि खरगोन. बुलडोझर.

१० एप्रिलला राम नवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातल्या खरगोनमधे हिंदू आणि मुसलमान गटांमधे चकमक उडाली. दगडफेक झाली. दोन्ही बाजूची माणसं आणि पोलीस जखमी झाले. दोन्ही धर्मियांनी एकमेकावर हिंसा केल्याचा आरोप केला. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकावर चकमक घडवून आणल्याचा आरोप केला. एक दिवस संचारबंदी झाली. तिसऱ्या दिवशी खरगोनमधल्या मुस्लीम वस्तीवर बुलडोझर चालला. दुकानं, घरं, बुलडोझरनं जमीनदोस्त केली. राम नवमीच्या चकमकीची कायदेशीर चौकशी झाली नव्हती. चकमकीत दोन्ही धर्माची लोकं होती. पण मुसलमानांना जबाबदार धरून त्यांची वस्ती जमीनदोस्त करण्यात आली….

Read More Read More