Browsed by
Month: December 2019

राजीव गांधींचा खून, कां व कसा.

राजीव गांधींचा खून, कां व कसा.

राजीव गांधींचा खून कां झाला? राजीव गांधी-कारण-राजकारण. ले. नीना गोपाल. मनोविकास प्रकाशन. )( १८१५ साली ब्रिटिशांनी डचांकडून श्रीलंका घेतली. कारभार चालवण्यासाठी तेव्हां भारतातल्या तामिळनाडूतले तमिळ त्यांना उपयोगी ठरले कारण तमिळ लोकं इंग्रजी शिकलेले होते, कारभार-साहित्य इत्यादी बाबतीत तरबेज होते. १९४८ साली लंका स्वतंत्र झाली तेव्हां लंकेतल्या सरकारी नोकऱ्यांतल्या ६० टक्के नोकऱ्यात तमिळ होते, विद्यापीठांत त्यांचंचं वर्चस्व होतं. लोकसंख्येत १५ टक्के असले तरी तमिळाना वाटे की लंका हा त्यांचाच देश आहे.  लंका हा बहुसंख्य सिंहलींचा, बौद्ध धर्मियांचा देश. १९५६ साली लंकेनं…

Read More Read More

या आंदोलनाचा अर्थ काय?

या आंदोलनाचा अर्थ काय?

गेल्या आठवड्यात भारतभर विद्यार्थ्यांनी  नागरीकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला. पोलिसांनी त्याना बडवून काढलं. वसतीगृह, ग्रंथालयात घुसूघुसू पोलिसांनी त्यांना बदडलं. पोलिसांसारखा वाटावा असा वेश करून हिंदुत्ववादी गुंडांचाही त्या कामी वापर करण्यात आला. हा नागडा उघडा फॅसिझम इतका असह्य होता की देशभर लाखो नागरीक रस्त्यावर आले, त्यांनी आंदोलन केलं. सुरवातीला हे आंदोलन विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवण्यासाठी होतं, नंतर ते नागरीकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात परिवर्तीत झालं.  अगदी सुरवातीपासून सुधारणांना झालेला विरोध नराजकीय होता. आसाम, मिझोरम, अरूणाचल, त्रिपुरा या ठिकाणचे नागरीक आंदोलनात उतरले होते कारण…

Read More Read More

नागरीकत्व सुधारणा विधेयक. अंगाशी आलेली राजकीय उठाठेव.

नागरीकत्व सुधारणा विधेयक. अंगाशी आलेली राजकीय उठाठेव.

नागरीकत्व सुधारणा विधेयक भाजपनं वाजत गाजत मंजूर केलं. अनेक वर्षांपूर्वी शेजारी देशांत छळाचा बळी ठरणाऱ्या हिंदूना भारतात आश्रय देऊन आपण त्यांना न्याय दिला असं भाजपचं म्हणणं आहे. भारतात आणि जगातच हिंदूवर अन्याय होतोय आणि भाजपच केवळ हिंदूना न्याय देतो असं सांगण्यासाठी सुधारणा विधेयकाचा वापर भाजप करत आहे. हिदूंचा शेजारी देशात छळ होण्याला काँग्रेस जबाबदार असं सांगण्यासाठी हे आणखी एक निमित्त भाजपनं वापरलं.  खरोखरच हे विधेयक भाजपनं हिंदूंना न्याय देण्यासाठी आणलं कां? घटना क्रम पाहिला तर भाजपचा हा दावा फोल ठरतो….

Read More Read More

इराण. आपल्याला दुःखात लोटणारं सरकार जनतेला नकोय.

इराण. आपल्याला दुःखात लोटणारं सरकार जनतेला नकोय.

इराणी नागरिकांच्या आंदोलनानं  १६ नोव्हेंबर रोजी  शिखर गाठलं. त्या दिवशी इराणभर,  खेड्यात आणि शहरांत, १०० ठिकाणी माणसं रस्त्यावर उतरली. त्यात शेतकरी, कामगार, वकील, इंजिनियर, डॉक्टर, व्यापारी इत्यादी सर्व थरातली मंडळी होती. आंदोलकांची  संख्या २ लाखांच्या आसपास होती. आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं तीन दिवस इंटरनेट बंद केलं होतं. सरकारनं दिलेली माहिती अशी. नागरिकांनी ५० लष्करी आणि पोलिस ठाणी, १८३ पोलिसांच्या गाड्या, ७३१ बँका, ७० पेट्रोल पंप, ९ मशिदी आणि १०७६ बाईक्सवर हल्ले केले, जाळपोळ केली, तोडफोड केली, ३०७ खाजगी कार आणि ३४…

Read More Read More