Browsed by
Month: February 2021

‘ सर ‘ एक चांगली फिल्म

‘ सर ‘ एक चांगली फिल्म

सर ही फिल्म २०१८ साली तयार झाली होती, आता ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालीय. रत्ना आणि आश्विन अशा दोघांमधल्या संबंधांची ही गोष्ट आहे.  आश्विन या एका श्रीमंत तरूणाच्या घरी रत्ना मोलरीण म्हणून कामाला लागते. रत्ना गावाकडून आलेली, आश्विन न्यू यॉर्क-मुंबईवाला. चित्रपटाच्या सुरवातीला आश्विन हा रत्नाचा सर असतो, चित्रपट संपता संपता तो रत्नाचा आश्विन होतो. अगदीच भिन्न परिस्थितीत वाढलेल्या दोन  व्यक्ती एकजीव होण्याचा प्रवास चित्रपटात आहे. चित्रपटाचा विशेष असा की त्यात दृश्याला, दिसण्याला महत्व आहे. ऐकणं कमी आहे. रत्ना आणि आश्विन यांच्यातले…

Read More Read More

झटपट व्हिस्की

झटपट व्हिस्की

झटपट व्हिस्की आता झटपट व्हिस्क्या बाजारात येत आहेत. काही तासात व्हिस्की तयार होईल आणि बाटलीबंद होऊन ग्लासांपर्यंत पोचेल. साधारण व्हिस्की तयार व्हायला तीन वर्षं लागतात. जातीवंत व्हिस्की पंधरा ते सत्तर वर्षात तयार होते. ओक वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या पिंपात व्हिस्की साठवली जाते. लाकूड आणि व्हिस्की यांच्यात वेगवेगळ्या तापमानात रासायनीक घटकांची देवाण घेवाण होते. व्हिस्की लाकडात जाते, लाकूड व्हिस्कीत जातं. फार सावकाशीनं ही प्रक्रिया पार पडते.अनेक उन्हाळे आणि हिवाळे ही व्हिस्की पहाते. व्हिस्की फर्मेंट करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्या पाण्यालाही…

Read More Read More

तुकारामाचे अभंग तरले याचा अर्थ…..

तुकारामाचे अभंग तरले याचा अर्थ…..

दोन वेळा बेचिराख झालेलं ग्रंथालय. जर्मनीतला नाझी काळ हा जर्मनीतला सर्वात भयानक काळ मानता येईल. हिटलर सांगेल ते खरं असं जर्मन माणसानी मानलं. शुद्ध आर्य जर्मन रक्त, ज्यू अशुद्ध आणि वाईट, डावे आणि समलिंगी जर्मनद्रोही, माणसावर प्रयोग करून एक नवीन मानवी वंश जन्माला घालता येतो, अशुद्ध लोकांना मारून टाकायचं इत्याजदी अवैज्ञानिक, क्रूर, अमानुष हिटलरी कल्पना जर्मन लोकांनी मान्य केल्या. हिटलर सांगेल तेच ज्ञान असं जर्मन जनतेनं ठरवलं आणि इतर सारं ज्ञान जर्मनविरोधी असं ठरवून विद्यापीठं, पुस्तकं नाझींनी नष्ट करायचा विडाच…

Read More Read More

“सांस्कृतीक” क्रौर्य

“सांस्कृतीक” क्रौर्य

यांग जिशेंग यांच्या  World Turned Upside Down या  नव्या  पुस्तकाची दखल पश्चिमी देशातली माध्यमं सध्या घेत आहेत. या पुस्तकात लेखकानं माओच्या १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या सांस्कृतीक क्रांतीवर सविस्तर लिहिलं आहे.  माओच्या राजकीय जीवनात तीन मोठी पर्वं झाली. पहिलं पर्व लाँग मार्च. या काळात माओनं कम्युनिष्ट पार्टी चीनमधे रुजवली आणि यथावकाश माओ सत्ताधारी झाला.  दुसरं पर्व आकाशउडीचं, झटपट आर्थिक विकासाचा प्रयत्न. माओचं डोकं अजबच म्हणायचं. चिनी समाज माओला पूर्ण बदलायचा होता. बदल चुटकीसरशी होऊ शकतात असं माओला वाटत असावं. त्यामुळं दुसऱ्या पर्वात माओनं…

Read More Read More