Browsed by
Month: May 2023

चित्रपटाचा चित्रपट, ऑफर

चित्रपटाचा चित्रपट, ऑफर

ऑफर. गॉडफादर असा घडला. गॉडफादर १९७२ साली पडद्यावर आला.  चित्रपटाच्या इतिहासातला सर्वात जास्त लोकप्रिय चित्रपट ठरला. चित्रपटाचे आणखी दोन भाग नंतर झाले. तेही लोकप्रिय झाले. माणसं अजूनही तो चित्रपट पहात असतात. कधीही तो पहावा, त्यात काही तरी नवं सापडतं. मारियो पुझ्झोची त्याच नावाची कादंबरी १९६९ साली प्रसिद्ध झाली होती. पुझ्झो आणि दिक्दर्शक फ्रान्सिस कोपोल्ला या दोघांनी मिळून चित्रपटाची पटकथा लिहिली. न्यू यॉर्कमधल्या गुन्हेगारी जगाची गोष्ट चित्रपटात आहे.विटो कॉर्लिओन आणि त्याची गँग हा चित्रपटाचा विषय आहे. डॉन कॉर्लिओनची गँग आणि न्यू…

Read More Read More

पुस्तकवेड

पुस्तकवेड

BOOK MADNESS: STORY OF BOOK COLLECTORS IN AMERICA. DENISE GIGANTE. ।। पुस्तकं लोकांना वेड लावतात. नाना प्रकारे.  कोणाला पुस्तकं वाचायला आवडतं. वाच वाच वाचतात. कामासाठी किवा हौस म्हणून. त्यांना पुस्तकातले किडे असं म्हणायची पद्दत आहे. कोणी भरपूर वाचतो पण काय वाचायचं याचा काही एक विचार ते करतात, ठरवून वाचतात. विषय, लेखक ही माणसं ठरवतात. कोणी माणसं वाचत फारसं नाहीत पण त्यांना पुस्तकं जमवायचा नाद असतो. आपल्याकडं पुस्तकं आहेत, इतकी आहेत, असली आहेत याचा त्यांना अभिमान असतो. ती माणसं भेटली की…

Read More Read More

ओटो नावाची कॉमेडी

ओटो नावाची कॉमेडी

अ मॅन कॉल्ड ओटो. ओटो नावाचा एक फार म्हातारा न झालेला जेमतेम साठी उलटलेला माणूस आहे. निवृत्त झालाय. एकटा आहे. पत्नी काही दिवसांपूर्वी गेलीय. स्वभावानं कटकट्या आहे. सभोवतालची कोणतीच गोष्ट त्याला सुखावत नाही.  एक बिचारं मांजर त्याच्या गराजच्या दारात निमूट उभं असतं.  ते ओटोला पहावत नाही. उगाचच त्या मांजराला हाकलून लावतो. कचरा कुंडीच्या ठिकाणी एक तरूण सायकल उभी करतो. ओटो त्याला हटकतो. ही सायकल उभी करायची जागा नाही असं सुनावतो आणि सायकल तिथून हटवायला सांगतो. त्यामुळं लोकांपासून दुरावलाय.वैतागलाय. आत्महत्या करायचं…

Read More Read More

घातक औषधं विकणारा उघडा पाडला एका फोटोग्राफरनं

घातक औषधं विकणारा उघडा पाडला एका फोटोग्राफरनं

 All the Beuty and the Bloodshed. || प्रस्तुत माहितीपट अमेरिकन सामान्य माणसाला, विशेषतः भारतीय माणसाला, हादरवून टाकणारा, एक अगदीच नवं जग दाखवणारा आहे. हा माहितीपट समाजाच्या परिघावरच्या माणसांचं जगणं दाखवतो आणि समाजाच्या मध्यभागी राहून समाजाचं जगण हिरावून घेणारी माणसं दाखवतो. नॅन गोल्डिन ही फोटोग्राफर. तिचं लहानपण फार तणावाचं. आई वडिलांचं पटत नसे, वडील आईला मारझोड करत असत. तिची मोठी बहीण. बंडखोर होती. आत्यंतिक तणावाखाली वाढली. तिनं आत्महत्या केली. नॅनवर बहिणीचा प्रभाव.नॅनही मानसिक क्लेषातच वाढली. घराबाहेर पडली. एका मित्राबरोबर रहायला गेली….

Read More Read More