Browsed by
Month: June 2018

खाण्यापिण्याच्या खिडकीतून जग दाखवणारा शेफ, बोर्डेन.

खाण्यापिण्याच्या खिडकीतून जग दाखवणारा शेफ, बोर्डेन.

अँथनी बोर्डेननं छताला दोर टांगून त्यात आपली मान अडकवून घेतली. हॉटेलमधे. तो रात्री डीनरला आला नाही, सकाळी न्याहरी घ्यायला आला नाही म्हणून चिंतेत पडलेला त्याचा मित्र हॉटेलमधल्या बोर्डेनच्या खोलीवर गेला तेव्हां दार तोडल्यावर बोर्डेनचा देह टांगत्या अवस्थेत त्याला दिसला. पार्टस अननोन या मालिकेच्या चित्रीकरणासाठी तो फ्रान्समधल्या एका हॉटेलात मुक्कामाला होता, स्ट्रासबर्ग या गावात तो चित्रीकरण करणार होता. बराक ओबामानी ट्वीट केलं ” त्यानं आम्हाला अन्नपदार्थ शिकवले, अन्नपदार्थ आपल्याला कसं एकत्र आणतं ते शिकवलं. अज्ञाताबद्दल आपल्याला असणारी भीती त्यानं कमी केली….

Read More Read More

  सारी मानव जातच नष्ट करणारं अमेरिकन (रशियनही) अणुसंहार यंत्र.

  सारी मानव जातच नष्ट करणारं अमेरिकन (रशियनही) अणुसंहार यंत्र.

सारी मानव जातच नष्ट करणारं अमेरिकन (रशियनही) अणुसंहार यंत्र. ।। द.कोरियाचे किम उन यांच्या अणुधमकीला उत्तर देताना अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप म्हणाले की त्यांचंही बोट अणुबाँबच्या बटनावर आहे, कुठल्याही क्षणी ते बटन दाबू शकतात. ट्रंप हे गृहस्थ विश्वास ठेवण्यालायक नसल्यानं, त्यांचं बोलण्यात बोलणं नसल्यानं त्यांचं बोलणं हसण्यावारी नेलं जातं. परंतू त्यांची धमकी काय प्रकारची आहे याचा प्रत्यय डॅनियल एल्सबर्ग यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून येतो. १९६० च्या सुमाराला अमेरिकेनं तयार केलेल्या अणुयुद्धाच्या कार्यक्रमाचे कागद एल्सबर्ग यांच्या हाती लागले. केवळ प्रेसिडेंटच…

Read More Read More

कार्यक्षमता. किती नफा, किती तोटा.

कार्यक्षमता. किती नफा, किती तोटा.

कार्यक्षमता, किती नफा, किती तोटा. The Efficiency Paradox: What Big Data Can’t Do Edward Tenner एफिशियन्सी म्हणजे कार्यकुशलता, कार्यक्षमता. कार्यक्षमतेमुळं कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त फायदा मिळतो, कमीत कमी निविष्टा करून जास्तीत जास्त उत्पादन मिळतं, प्रत्येक युनिट साधनापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवतं. मानवी समाजव्यस्था कार्यक्षमतेच्या विचारानं पछाडलेली आहे. एडवर्ड टेनर त्यांच्या एफिशियन्सी पॅरॅडॉक्स या पुस्तकातून या पछाडलेपणाला, जुनूनला, आव्हान दिलय. कार्यकुशलता वाढावी, जास्तीत जास्त नफा मिळावा, जास्तीत जास्त उत्पादन मिळावं, जास्तीत जास्त आराम मिळावा यासाठी माणसानं यंत्रं शोधली, तंत्रं शोधली,…

Read More Read More

” इकॉनॉमिस्ट ” ची दीडशे वर्षांची वाटचाल सांगणारं पुस्तक

” इकॉनॉमिस्ट ” ची दीडशे वर्षांची वाटचाल सांगणारं पुस्तक

The Pursuit of Reason:The Economist 1843-1993 Ruth Dudley Edwards || इकॉनॉमिस्ट या पेपरच्या स्थापनेपासून (१८४३) ते १९९३ साली प्रकाशनाला १५० वर्षं पूर्ण होईपर्यंतचा इतिहास एडवर्डस यांनी या पुस्तकात मांडला आहे. १८४३ साली सुरवातीला इकॉनॉमिस्टचा खप १७५० होता. २०१८ साली तो पाच लाखाच्या पलीकडं आहे. माहिती आणि माहितीचा अर्थ सांगणाऱ्या या साप्ताहिकानं देशाची सीमा कधीच मानली नाही. मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार हे पेपरचं मुख्य सूत्र राहिलं, तो ज्या देशात निघाला तो ब्रीटन हे या पेपरचं मुख्य सूत्र कधीच नव्हतं. आज साऱ्या…

Read More Read More

स्टरलाईट अनर्थ. टाळता येणं शक्य आहे.

स्टरलाईट अनर्थ. टाळता येणं शक्य आहे.

तुतीकोरीनमधला,  स्टरलाईट कंपनीचा, खनीजापासून तांबं मिळवण्याचा उद्योग,  तामिलनाडू सरकारनं बंद केला आहे. सुमारे सात हजार माणसं बेकार झाली आहेत. उद्योगानं होणाऱ्या प्रदुषणाचा त्रास सहन करणाऱ्या लोकांनी केलेल्या आंदोलनात १३ माणसं मेली, शेकडो जखमी झाली. उद्योग बंद होणं हा त्याचा परिणाम. सुखरूप जिवंत रहाणं (स्थानिकांचं) आणि रोजगार (स्थानिकांचा) आणि फायदे (देशभराला होणारे) या तिहींपैकी स्थानिकांचं सुखरूप जिवंत रहाणं निर्णायक ठरलं. नीरी (नॅशनल एनवायरनमेंटल इंजिनियरिंग रीसर्च इन्सटिट्यूट) या केंद्र सरकारच्या संस्थेनं दोन तीन वेळा दिलेल्या अहवालात स्टरलाईटनं हवा, जमिन, पाणी यांचं प्रदुषण…

Read More Read More