Browsed by
Month: March 2018

वियेतनाम,बिनलादेन,सीरिया बाँबिंग- सरकारचा खोटेपणा नागडा करणारे पत्रकार सेमुर हर्श

वियेतनाम,बिनलादेन,सीरिया बाँबिंग- सरकारचा खोटेपणा नागडा करणारे पत्रकार सेमुर हर्श

शोध पत्रकारीची पन्नास वर्षं. वियेतनाममधे अमेरिकन सैनिकांनी केलेलं निरपराध माणसांचं हत्याकांड जगासमोर उघड करण्याच्या घटनेला पन्नास वर्षं झाली. १४ मार्च १९६८ या दिवशी वियेतनाममधील मी लाय या गावात अमेरिकन सैनिकांनी साडेतीनशे ते पाचशे निरपराध स्त्रिया आणि मुलांना गोळ्या घालून मारलं. विनाकारण. प्रेतांच्या ढिगाखाली लपलेलं एक छोटं मूल प्रेतं दूर सारून बाहेर पडलं. त्यालाही जिवंत ठेवायचं नाही असं ठरवून सैनिकांनी गोळ्या घातल्या. एका निःशस्त्र स्त्रीला सैनिकानं लाथाबुक्क्यांनी बडवलं,  ती खाली पडली असताना, तिला गोळ्या घातल्या. हेलिकॉप्टरमधून जमिनीवरच्या सैनिकांना हवाई संरक्षण  देणाऱ्या…

Read More Read More

पुस्तक. जमीन संपादन प्रक्रियेत सुधारणेची गरज.

पुस्तक. जमीन संपादन प्रक्रियेत सुधारणेची गरज.

The Political Economy of Land Acquisition in India How a Village Stops Being One Dhanmanjiri Sathe palgrave, macmillan. || भारताचं औद्योगीकरण होतय त्यासाठी इन्फ्रा स्ट्रक्चर उभं रहातय. रस्ते, रेलवे, तयार होत आहेत, त्यांच्या आधारावर कारखाने आणि व्यापारी संस्था उभ्या रहात आहेत. काळाच्या गतीनुसार हे घडत आहे, ते अटळ आहे. शेतीवर आधारलेला समाज हे रूप बदलून उद्योग व व्यापार यावर आधारलेला समाज असं रूप भारत धारण करत आहे. त्यासाठी सरकार जमीन संपादन करत आहे. बहुतांश जमीन शेतीखालील असल्यानं ती शेतकऱ्यांकडून घेतली…

Read More Read More

चीनचे तहहयात अध्यक्ष

चीनचे तहहयात अध्यक्ष

सी जिनपिंग यांना कायमचे म्हणजे तहहयात चीनचे अध्यक्ष रहायला परवानगी देणारी घटना दुरुस्ती चीनच्या जनसभेनं मंजूर केली. त्यांना आता कोणीही, कोणत्याही कारणासाठी अध्यक्षपदावरून काढू शकत नाही. याच ठरावात एका  विशेष देखरेख आयोगांची निर्मिती करण्यात आली.  हा आयोग देशातलं लष्कर, पक्ष, सरकारी यंत्रणा यातला भ्रष्टाचार शोधून काढेल आणि सापडलेल्या लोकांवर कारवाई करेल. अशाच प्रकारच्या कारवाईसाठी आधीच एक समिती चीनमधे आहे. या समितीचं प्रमुखपद सी जिनपिंग यानी स्वतःकडं घेतलं होतं आणि त्या समितीनं केलेल्या तपासानुसार १०० पेक्षा जास्त सैन्यातले जनरल आणि नाविक…

Read More Read More

टोन्या हार्डिंग या जिगरबाज स्केटर महिलेची अमेरिकन कहाणी.

टोन्या हार्डिंग या जिगरबाज स्केटर महिलेची अमेरिकन कहाणी.

२०१८ च्या ऑस्कर स्पर्धेमधे एलिसन जेनी यांना सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या मुलीला फटकावणारी, प्रशिक्षकाला झापणारी, मुलीवर सुरी फेकून मारणारी, चार नवरे करणारी, एक स्वतंत्र हिंसक स्त्री जेनी यांनी उभी केलीय. पुरस्काराला लायक असाच अभिनिय जेनी यांनी केलाय.चित्रपटाचं नाव आहे आय   टोन्या. या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री मॅकेना ग्रेस हिचं कामंही छान होतं आणि चित्रपटही थरारक होता. टोन्या हार्डिंग या स्केटिंग चँपियन स्त्रीवर चित्रपट बेतलेला आहे. १९९४ च्या सुमाराला टोन्या ही एक खरीखुरी स्त्री होती, अमेरिकेत ओरेगनमधे. आय टोन्या…

Read More Read More

नीरव मोदी प्रकरण, सार्वजनिक बँका बुडण्याकडं वाटचाल?

नीरव मोदी प्रकरण, सार्वजनिक बँका बुडण्याकडं वाटचाल?

नीरव मोदी प्रकरणातून लक्षात येतंय की सार्वजनिक बँकांची  स्थिती  खराब आहे. बँका बुडण्याची शक्यता आज तरी नाही. परंतू आर्थिक स्थिती बिघडली तर बँका बुडण्याचा दिवस जवळ येईल.  १ जानेवारी २०१८ रोजी नीरव मोदी परदेशात गेले. अमेरिका, बेल्जियम इत्यादी देशांत त्यांची घरं आहे, व्यवसाय आहे. १६ जानेवारी २०१८ रोजी नीरव मोदींतर्फे एका माणसानं  आयात मालाच्या तारणावर कर्ज मंजूर करण्याची हमी मुंबईतल्या पंजाब नॅशनल बँकेकडं मागितली. बँकेतला अधिकारी म्हणाला की तसं हमीपत्र देण्यासाठी आयात मालाच्या किमतीयेवढी रोख रक्कम बँकेत भरा किंवा त्या…

Read More Read More