Browsed by
Month: February 2019

पुलवामानंतर….

पुलवामानंतर….

पुलवामामधे जैशे महंमदच्या हस्तकानं सीआरपीएफच्या ४३ जवानांना ठार मारलं. नंतर भारतीय विमानांनी पाकिस्तानात खोलवर जाऊन  जैशे महंमदच्या केंद्रावर हल्ला केला. नंतर पाकिस्तानी विमानानी भारतीय हद्दीत हल्ला केला.  पाकिस्तानवर हल्ले करून त्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान केलं पाहिजे अशी भावना भारतीय जनतेमधे  फैलावली आहे. भाजप म्हणत आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्याचं सामर्थ्य आणि इच्छाशक्ती केवळ त्यांच्याकडंच आहे, बाकीचे पक्ष कुचकामी आहेत, येत्या निवडणुकीत भाजपलाच निवडून द्या असा उघड प्रचार भाजप करत आहे. विरोधी पक्ष म्हणतात की पाकिस्तानवर कारवाई जरूर केली पाहिजे…

Read More Read More

काश्मीरवर बहिष्कार? असं नका करू.

काश्मीरवर बहिष्कार? असं नका करू.

सैन्यातल्या एका निवृत्त कर्नलनं म्हणे एक वक्तव्य केलं. ”  काश्मिरमधे जाऊ नका. अमरनाथ यात्रेला जाऊ नका. काश्मिरी लोकांकडून वस्तू खरेदी करू नका. काश्मिरी व्यापाऱ्याशी व्यवहार करू नका. काश्मिरी लोकांवर बहिष्कार घाला. “ पुलवामामधे  जैशे महंमद या पाकिस्तानी सैन्यानं पुरस्कृत केलेल्या अतिरेक्यानं ४३ भारतीय सैनिक मारल्यानंतर देशभर उसळलेल्या संताप आणि दुःखाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य झालंय. या वक्तव्याचा गंभीर परिणाम भारत देशाच्या शांतता व स्थैर्यावर होऊ शकतो. कोण आहेत हे कर्नल? शोधून काढणं कठीण नाही. मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी कर्नलच्या वक्तव्याला…

Read More Read More

भ्रष्टाचार आहे की नाही ते माहित नाही पण गैरव्यवहार आणि घातक व्यवहार मात्र नक्कीच आहे.

भ्रष्टाचार आहे की नाही ते माहित नाही पण गैरव्यवहार आणि घातक व्यवहार मात्र नक्कीच आहे.

  राफेल विमानांच्या किमती वाढल्या.करारानुसार  वाढीव रक्कम दसॉ आणि रिलायन्स या कंपन्यांना वाटून मिळाली. ।। १३ मार्च २०१४ रोजी राफेल विमानांच्या बाबतीत दसॉ ही फ्रेंच कंपनी आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स (हिंए) ही भारत सरकारची कंपनी यांच्यात करार झाला. त्यानुसार भारतासाठी दसॉ १०८ लढाऊ विमानं तयार करणार होती. प्रत्येक विमानाची अदमासे किमत ६७० कोटी रुपये होती. ७० टक्के निर्मिती हिंए आणि ३० टक्के निर्मिती दसॉ करणार होती. २७ मे २०१४ रोजी एनडीएचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अरूण जेटली संरक्षण…

Read More Read More

नागरीक कायदा सुधारणा. निर्रथक, घातक, राजकीय खेळी.

नागरीक कायदा सुधारणा. निर्रथक, घातक, राजकीय खेळी.

नागरीकत्व कायदा सुधारणा, राजकीय खेळी. भारत सरकारचं नागरीकत्व कायद्यातल्या सुधारणांचं विधेयक उत्तर पूर्व भारतात खळबळ माजवून राहिलं आहे. नागरीकांनी या विधेयकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मांडणाऱ्या सत्ताधारी भाजपतल्या लोकांनी, आमदारांनीही हे विधेयक नाकारलं आहे. हे विधेयक १९५५ च्या नागरीकत्व कायद्यात सुधारणा सुचवतंय. १९५५ च्या कायद्यानुसार बाहेरून भारतात आलेल्या माणसांकडं योग्य प्रवासी कागदपत्रं नसतील किंवा  भारतात आल्यानंतर परवानगी दिलेला काळ ओलांडून अधिक काळ माणूस भारतात राहिला असेल तर त्याला बेकायदेशीर स्थलांतरीत मानलं जातं, हाकललं जातं. बाहेरून येणारी काही माणसं …

Read More Read More