Browsed by
Month: November 2021

नोटबंदी, एक महाघोटाळा.अहंमन्यता आणि मूर्खपणातून जन्मलेला.

नोटबंदी, एक महाघोटाळा.अहंमन्यता आणि मूर्खपणातून जन्मलेला.

 नोव्हेंबरमधे नोटबंदीला पाच वर्षं पूर्ण झाली.   त्या बद्दल ना नरेंद्र मोदींनी भाषण करून स्वतःचं कौतुक केलं, ना सरकारनं ढोल बडवला, ना भाजपनं आपण कशी पाकिस्तानची वा दहशतवाद्यांची जिरवली यावर ट्रोल मोहिम केली.   त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण नोटबंदी हे सपशेल अपयश होतं. मीरा सन्याल यांचं पुस्तक तपशील, अभ्यास आणि विश्लेषणातून  नोटबंदीनं काहीच साध्य केलं नाही असं सांगतं. THE BIG REVERSE HOW DEMONETIZATION KNCKED INDIA OUT या पुस्तकात मीरा सन्याल तपशीलात जाऊन एकेका मुद्द्यावर नोटबंदी हा कसा गाढवपणा होता ते स्पष्ट करतात.   मोदींना काय…

Read More Read More

पैसा परदेशात गुंतवणारे भारतीय

पैसा परदेशात गुंतवणारे भारतीय

शील ओसवाल नावाच्या एका भारतीय माणसानं ब्रिटीश व्हर्जिन आयलंड या एका बेटावर बिसकॉन नावाची कंपनी स्थापन केली, पैसे त्या कंपनीत गुंतवले. त्या बेटावर कंपनी नोदवली तर तिथं कर वगैरे नसतात, पैसे कुठून आले याची चौकशी त्या बेटाचं सरकार करत नाही, कंपनी काय व्यवहार करते तेही विचारत नाही. ओसवाल यांनी त्या कंपनीतर्फे इंडोनेशियातल्या जीटीबीओ नावाच्या खाणकंपनीत पैसे गुंतवले. इंडोनेशियन खाण कंपनीनं कच्चा माल विकून आणि खनीज यंत्रं विकून काही करोड डॉलर मिळवले. इंडोनेशिय कंपनी आणि बेटावरची कंपनी याना त्यातून नफा मिळाला,…

Read More Read More

अण्णा आणि अरविंद

अण्णा आणि अरविंद

आप अँड डाऊन. ।। अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल ही दोन माणसं गेली वीसेक वर्षं सतत बातम्यांमधे असतात. कधी ते लोकप्रियतेच्या शिखरावर असतात तर कधी टीकेचे बळी ठरलेले असतात. ते मधे मधे झाकोळल्यासारखे वाटतात, पण मावळत नाहीत, चमकू लागतात. भारतातलं राजकीय वातावरण गरगर ढवळून काढणाऱ्या या दोन व्यक्तींच्या अंतरंगाची काहीशी कल्पना आप अँड डाऊन हे प्रस्तुत पुस्तक देतं. पुस्तक २०१८ साली प्रसिद्ध झालंय लेखक आहेत, मयंक गांधी. गांधीची दोन प्रमुख वैशिष्ट्यं. ते अर्बन प्लानर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहे. व्यवस्थापन…

Read More Read More

मेटाकुटीला आलेलं मेटा

मेटाकुटीला आलेलं मेटा

फेसबुकनं नाव बदललंय.आता मेटा मेटा झालंय. परंतू अगदी नेटकंच या मेटाचं वागणं उघड करणारी माहिती तिथं काम करणाऱ्या लोकांनी जगासमोर मांडली. तेव्हांच प्रश्न निर्माण झाला होता की या मेटाचं काय करायचं. आता तो प्रश्न या मेटाचं काय करायचं असा विचारता येईल.  जगभर मेटाचा उपयोग हिंसा, दंग्यांना चिथावणी देण्यासाठी केला जातोय. सरसकट एकादा धर्म,एकादा समाजगट वाईट ठरवून त्याच्याबद्दल खोटी माहिती व द्वेष पसरवणाऱ्या पोस्टी मेटावर सर्रास मोकाट फिरतात, त्यातल्या जेमतेम शतांश पोस्टी मेटा रोखतं किंवा त्यांच्यावर त्या अयोग्य असल्याचं लेबल चिकटतवतं….

Read More Read More