Browsed by
Month: April 2018

ऑक्टोबर. कथा, कविता आणि डॉक्युमेंटरी.

ऑक्टोबर. कथा, कविता आणि डॉक्युमेंटरी.

‘ ऑक्टोबर ‘ हा  प्राजक्ताची फुलं  जपणाऱ्या एका मुलीचा, तिच्या आईचा आणि तिच्या एका मित्राचा सिनेमा आहे. शिवली ही पंचतारांकित हॉटेलमधे हॉटेल  व्यवसाय शिकणारी उमेदवार मुलगी आहे. तिची आई आयआयटीत प्रोफेसर आहे. शिवली हुशार आहे, बुद्धीमान आहे, कामं नीटनेटकेपणानं करणारी मुलगी आहे. हॉटेलात त्यांचा एक तरुण गट आहे. दिल्ली या धकाधकीच्या शहरात ती मुलं आपलं आयुष्य कोरण्याच्या प्रयत्नात आहेत. तिच्या धडपडीत डॅन नावाचा एक इरॅटिक मुलगा तिचा सहकारी आहे. डॅनबद्दल शिवलीला उत्सूकता आहे, प्रेम आहे की माहित नाही. डॅन मात्र…

Read More Read More

साधूंच्या हातात राज्य

साधूंच्या हातात राज्य

  नामदेव दास त्यागी हा माणूस त्याच्या ड्रेसवरून साधू आहे असं दिसतं. कपाळावर भस्माचे पट्टे असतात. जटा आहेत.  न शिवलेलं वस्त्र गुंडाळतात. गळ्यात रुद्राक्षाच्या आणि कसल्या कसल्या तरी मण्यांच्या माळा असतात. त्यांच्याकडं एक लॅपटॉप नेहमी असतो. लोक त्यांना कंप्यूटर बाबा म्हणतात. त्यांच्याकडं एक हेलीकॉप्टरही आहे. कंप्यूटर बाबांना मध्य प्रदेशच्या लोकांची सेवा करायची आहे, पारमार्थिक किंवा अद्यात्मिक नव्हे, ऐहिक सेवा. २०१४ साली त्यांनी सेवा करता यावी म्हणून केजरीवाल यांच्याकडं आम आदमी पार्टीचं तिकीट मागितलं. मिळालं नाही.  त्यांनी भाजपशी जुळवून घ्यायचा प्रयत्न…

Read More Read More

कठुआ, उन्नाव, खैरलांजी. या देशात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही.

कठुआ, उन्नाव, खैरलांजी. या देशात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही.

कठुआ पोलिसांनी दाखल केलेली माहिती अशी. रासना गावातल्या संजीराम नावाच्या माणसानं त्याचा भाचा शुभमला सांगितलं की असिफा नावाची मुलगी आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूला घोडे चारण्यासाठी येत असते. तिच्यावर बलात्कार कर. बलात्कार करण्यासाठी गुंगी आणणारी औषधं विकत घेऊन ये. हे कृत्य लपून ठेवणं आणि कृत्यं करणाऱ्यांची सुटका होणं यासाठी संजीराम यांनी पाच लाख रुपये योजले. पोलिस खात्यात त्यांची माहितीची माणसं होती. त्यांना पैसे देण्याचं योजलं. १० जानेवारी २०१८ रोजी असिफा दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला गावाला लागून असलेल्या जंगलात घोडे घेऊन गेली…

Read More Read More

पुतीन पुन्हा निवडून आलेत

पुतीन पुन्हा निवडून आलेत

पुतीन अध्यक्ष होणारच होते, मतदान हा केवळ एक सोपस्कार होता. ६७ टक्के जनतेनं मतदान केलं त्यातल्या ७३ टक्के लोकांनी पुतीन यांना मतं दिली. इतर सात टिल्लूपिल्लू उमेदवार हरण्यासाठीच उभे  होते. अलेक्सी नेवाल्नी हे त्यातल्या त्यात वजनदार प्रतिस्पर्धी होते. पुतीन यांनी त्यांच्यावर नाना खटले भरून निवडणुकीत उभं रहायला परवानगी नाकारली.  नको असलेल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढायचा ही तर पुतीन यांची शैलीच आहे. तीनच वर्षांपूर्वी क्रेमलीनच्या दारातच बोरिस नेमत्सोव यांचा खून झाला, भर दिवसा. कोणी केला? कां केला? काहीही कळलं नाही. येवढंच माहित…

Read More Read More