Browsed by
Month: November 2022

पृष्ठभागाच्या खाली काही तरी घडतय.

पृष्ठभागाच्या खाली काही तरी घडतय.

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग ३. राजकीय प्रभाव, परिणाम? धुप्पा,   हिप्परगा (माळ), रामतीर्थ, पार्डी, डोंगरकडा नायगाव, या गावातल्या लोकांशी बोललो. विविध ठिकाणी. त्यासाठी फार चहा प्यावा लागला. दुधाच्या चहाचा वीट आल्यावर बहुतेकांनी छोट्या ग्लासातून अर्धा ग्लास डिकॉक्शन पाजलं. म्हणजे बिनदुधाचा काळा चहा.  लोकांना राहुल गांधीबद्दल कुतुहुल होतं.  ‘येवढा मोठा माणूस. टीव्हीवर दिसणारा. वडील, आजी, पणजोबा, पंतप्रधान. असा माणूस रस्त्यावर चालतो, लोकांच्याबरोबर, लोकांमधे मिसळतो. पाहुया तरी हा बाबा कोण आणि कसा आहे. छान वाटलं त्याला पहाताना भेटताना’  राहुलबद्दल लोकांना प्रेम आपुलकी निर्माण झाली…

Read More Read More

जनतेच्या मनात काय दडलंय?

जनतेच्या मनात काय दडलंय?

भाग २ यात्रेचा एक मुक्काम शंकर नगर परिसरात होता. १९८० च्या सुमारास त्या काळातले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे जावई भास्करराव पाटील खतगावकर यांनी या परिसरात साखर कारखाना उभा केला. त्यावरून या परिसराचं नाव शंकर नगर असं पडलं. सुमारे १५०० माणसांना या कारखान्यामुळं काम मिळत होतं. प्रारंभी तो चांगला चालला, २००५ साली बंद पडला,  रोजगार गेला. कारखान्यावरचं सहकारी बँकेचं कर्ज अजूनही फिटलेलं नाही. कारखान्याच्या परिसरात खतगावकर यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. त्या संस्था मात्र व्यवस्थित चालतात.   कारखान्याच्या परिसरात यात्रेकरूंच्या रहाण्याची गाड्या पार्क करण्याची,…

Read More Read More

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

भाग १. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ७ ते ११ नव्हेंबर इतका काळ चालली.  देगलूर, नांदेड, नायगाव ही शहरं; वन्नाळी, अटकळी, भोपाळा, रामतीर्थ, धुप्पा, हिप्परगा (माळ)नरसी,नायगाव, पार्डी इत्यादी दहाबारा छोटी गावं या मार्गात होती. राहूल गांधी नांदेडमधे १२५ किमी चालले. ६ विधानसभा मतदारसंघ आणि ३ लोकसभा मतदार संध या यात्रेत होते. सकाळी यात्रा सुरू होत असे, दुपारी विश्रांती. संध्याकाळी यात्रेचा दुसरा टप्पा. रात्री विश्रांती.  सकाळी एक नाका सभा, संध्याकाळी एक नाका सभा, दुपारी पत्रकार परिषद आणि निवडक लोकांशी चर्चा. रात्री एकादी मोठ्ठी जाहीर सभा. अशी…

Read More Read More

राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

क्राऊन या मालिकेचा पाचवा सीझन सुरु झाला आणि पहिल्याच दिवशी ११ लाख ब्रिटिशांनी तो पाहिला. अर्थात नंतरही ही मालिका पाहिली जाणार आहे. सीझन ब्रिटीश राणीच्या जीवनावर असल्यानं तो  ब्रिटीश माणसं चवीनं पहाणार, पण या मालिकेच्या देखणेपणामुळं जगातले इतरही लोक ती चवीनं पहात आहेत. जगभरच्या लोकांना ती पहावीशी वाटतेय कारण ती चटकदार आहे, तिच्यात थरार आहे, तिच्यात राजकारणाचे पृष्ठभागाखालचे थर पहायला मिळतात.अर्थात हेही सत्य आहे की इतिहास माहीत असायला हवा. पाचव्या सीझनमधे आपल्याला युवराज चार्ल्स, राणीला सिंहासानावरून उतरवायचा प्रयत्न करतोय असं…

Read More Read More

एका गुंडाला अमेरिकन मतदारांनी रोखलं

एका गुंडाला अमेरिकन मतदारांनी रोखलं

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन या पक्षांना सेनेटमधे(संसदेचं वरिष्ठ सदन) समसमान जागा मिळाल्यात. काँग्रेसमधे (संसदेचं कनिष्ठ सदन) रिपब्लिकनांना सुमारे १५ जागा अधिक मिळाल्या आहेत. काही जागांचे निकाल अजून बाकी आहेत. परंतू एकूणात जीत आणि हार यातला फरक नगण्यच असेल.  निवडणुकपूर्व स्थिती आणि अंदाज सांगत होते की रिपब्लिकनांकडं मतांचा पूर येईल. काही रिपब्लिकन धार्जिणे गट सांगत होत की नुसता पूर नव्हे तर सुनामी येईल आणि डेमॉक्रॅटिक पक्ष वाहून जाईल. तसं झालेलं दिसत नाही. रिपब्लिकनांना अपेक्षा होती तेवढी मतं मिळालेली नाहीत….

Read More Read More

जफर पनाही या इराणी दिक्दर्शकानं तुरुंगात राहून केलेला चित्रपट

जफर पनाही या इराणी दिक्दर्शकानं तुरुंगात राहून केलेला चित्रपट

इराणचे दिक्दर्शक जफर पनाही यांचा नो बेअर्स हा चित्रपट नुकताच न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात दिसला, गाजला. चित्रपटाचं कौतुक झालं. चित्रपटाची गोष्ट, चित्रपटाची रचना आणि चित्रपट प्रदर्शित होणं या तीनही गोष्टी नाट्यमय आणि थरारक आहेत. चित्रपटात दोन इराणी जोडपी आहेत. एक जोडपं आहे इराणच्या हद्दीपासून काही अंतरावर तुर्कीमधे. जोडप्यातल्या तरूणानं आपल्या प्रेयसीसाठी  एक बनावट पासपोर्ट आणि व्हिसा मिळवलाय. तो प्रेयसीला सांगतोय की तिनं पॅरिसला जावं, यथावकाश त्याला व्हिसा मिळेल तेव्हां तो पॅरिसला जाईल. तिला ते मंजूर नाहीये. ती जायला तयार नाहीये, एकदमच…

Read More Read More