Browsed by
Month: July 2022

ब्राझील ” राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय. ”

ब्राझील ” राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय. ”

ब्राझीलची न्याय व्यवस्था आणि सेनेट यांच्यात आता संघर्ष उद्भवला आहे. सेनेटनं स्वतंत्र चौकशी करून प्रेसिडेंट बोल्सोनारो यांच्यावर कोविड हाताळणी संदर्भात  खटला भरावा अशी मागणी केली. ब्राझीलच्या प्रॉसिक्युटरनं सेनेटची मागणी धुडकावली, सेनेटनं केलेले महत्वाचे आरोप फेटाळून लावलेत. सेनेटला आता प्रॉसिक्यूटरवरच खटला भरून त्यांची हकालपट्टी करायची मोहीम चालवावी लागणार असं दिसतंय. ब्राझीलमधे सात लाखापेक्षा जास्त माणसं कोविडनं मेली, कोविडचा प्रकोप अजूनही थांबायला तयार नाही.   बोल्सोनारोना हर्ड इम्युनिटी यायला हवी होती. म्हणजे असं की कोविडची लागण सर्व जनतेला होईल. सर्वानाच लागण झाल्यानतर प्रसाराचा संबंधच…

Read More Read More

उपहार, दिल्ली.१९९७ ची घटना. २०२२ मधे आरोपींचं वय झालं म्हणून शिक्षेतून सूट.

उपहार, दिल्ली.१९९७ ची घटना. २०२२ मधे आरोपींचं वय झालं म्हणून शिक्षेतून सूट.

१३ जून १९९७ मधे दिल्लीतल्या उपहार या सिनेमाघरात लोकं चित्रपट पहात असताना आग लागली. त्यात ५९ लोकं मेली, १०० पेक्षा जास्त माणसं जखमी झाली. २९ वर्षांच्या कोर्टबाजीनंतर या दुर्घटनेला जबाबदार असलेले आरोपी शिक्षा वगैरे न होता २०२२ च्या जुलै महिन्यात मोकळे झाले आहेत. आग लागू नये यासाठी काही पूर्वकाळज्या घ्यावा लागतात.आग लागल्यावर ती विझवणं, सिनेमा घरातल्या माणसाना सुखरूप बाहेर जाता येईल अशा रीतीनं सिनेमा घराची रचना करावी लागते.     आगी लागू नयेत आणि लागल्यास माणसांनी बाहेर पडणं याची सोय यात काही…

Read More Read More

एका सत्ताभुकेल्याला निवडून दिलं आता दुःख करतातेत

एका सत्ताभुकेल्याला निवडून दिलं आता दुःख करतातेत

श्रीलंकेतल्या घटना हा साऱ्या जगाला एक धडा आहे. ।। देश धोरणहीन, केवळ सत्तापिपासू पुढाऱ्यांच्या हातात गेला की काय होतं हे श्रीलंका जगाला दाखवून देतेय. ।। देशाचा अध्यक्ष पळून गेलाय. सिंगापुरात. हंगामी अध्यक्षाला लोकांनी त्याला  दरोडेखोर ठरवून हाकलून लावलंय. देशाच्या अधिकृत टीव्ही केंद्रात लोक घुसलेत आणि त्यांनी बाकीचे सारे कार्यक्रम बंद पाडून केवळ आंदोलनच टीव्हीवर दाखवलं जाईल असं जाहीर केलंय. जनता कोलंबो या राजधानीवर चाल करून गेलीय. पंतप्रधानाच्या घरासमोर हज्जारो माणसं जमली. पंतप्रधान पसार झालाय. पोलीस आणि लष्कर लोकांना रोखायचा प्रयत्न करतंय. पण…

Read More Read More

अग्नीवीर. चिमूटभर प्रयत्न करून पसाभर काम केल्यासारखं दाखवणं.

अग्नीवीर. चिमूटभर प्रयत्न करून पसाभर काम केल्यासारखं दाखवणं.

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमुळं अग्निवीर रोजगार योजनेचा विषय मागे पडला आहे. देशाच्या लष्कराच्या तीनही शाखांत मिळून ४७ हजार तरुणाना चार वर्षांसाठी दिल्या जाणाऱ्या रोजगार योजनेची चर्चा संसदेत झाली नव्हती. लष्करातही त्यावर काय विचार झाला ते कळायला मार्ग नाही.  अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या योजनेबद्दल शंका आणि असमाधान व्यक्त केलं होतं.  अचानक सरकारनं योजना जाहीर केली आणि वाद सुरु झाल्यावर सैन्य प्रमुख प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेची भलामण केली. आजवर कधी अशी घटना घडली नव्हती.  या योजनेचा लष्कराला किती फायदा आहे? एका…

Read More Read More

घाशीराम शिंदे

घाशीराम शिंदे

रहस्यपटात शोभेल असं नाट्य महाराष्ट्रात घडलं. १०५ आमदार असलेल्या भाजपनं ३० फुटीर सेना आमदारांचं सरकार करायला पाठिंबा दिला, सरकार तयार केलं. तांत्रीक दृष्ट्या फुटीर आमदारांचा गट सेनेचा आहे की नव्या कुठल्याशा पक्षाचा असेल की भाजपत दाखल झालेला असेल ते या क्षणी कळायला मार्ग नाही. घडलंय ते येवढंच की एकनाथ शिंदे या सेनेच्या आमदारानं सेनेचे आमदार गोळा केले आणि भाजपशी संगनमत करून सरकार स्थापन केलं. ३० माणसांच्या सरकारचा मुख्यमंत्री आणि १०५ माणसांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन झालंय. या ३० माणसांपैकी…

Read More Read More