Browsed by
Month: August 2019

जेटलींचं मरण आणि राम सेतू

जेटलींचं मरण आणि राम सेतू

केंद्रीय विकास मंत्री निशांक यांनी खरगपूरच्या आयआयटीतल्या इंजिनयरिंग विद्यार्थ्यांना राम सेतू या विषयावर संशोधन करण्याचा सल्ला दिला. राम सेतू असं नाव दिलेली दगडांची रांग भारत आणि लंका यांच्यामधल्या समुद्रात आहे. निशांक ज्या दगडांच्या रांगेचा उल्लेख करतात त्यालाच राम सेतू हे नाव अगदीच अलीकडं देण्यात आलंय. त्या आधी ती रांग अॅडमचा पूल म्हणून ओळखली जात होती. ख्रिस्ती समजुतीनुसार अॅडम शिक्षा झाल्यावर पृथ्वीवर पडला तो या पुलाच्या जागी असं काहींचं म्हणणं.   लंका मुळात कुठं होती यावर अनेक मतं आहे. मालदीव बेटं…

Read More Read More

देश विकत घ्यायला निघालेला प्रेसिडेंट

देश विकत घ्यायला निघालेला प्रेसिडेंट

ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश विकत हवाय, विकता काय, असा प्रश्न डोनल्ड ट्रंपनी डेन्मार्कच्या पंतप्रधानाला विचारला.  काश्मिर किंवा महाराष्ट्र किंवा गुजरात हा प्रदेश विकत घ्यायचा आहे अशी ऑफर भारतीय पंतप्रधानाला देण्यासारखा हा प्रकार. हा प्रश्नही केव्हां काढला? जेव्हां ट्रंप यांचा अनेक महिन्यापासून ठरलेला डेन्मार्कचा दौरा काही दिवसांवर आला होता. डेन्मार्क आणि अमेरिकेचे संबंध चांगले, मैत्रीचे आणि सहकार्याचे आहेत. ते संबंध बळकट करण्यासाठी वरील दौरा आखण्यात आला होता. अमेरिकन अध्यक्षाचा दौरा हे फार कटकटीचं प्रकरण असतं. त्यांच्या सुरक्षेची फार कडेकोट…

Read More Read More

स्वातंत्र्याची विरूप व्याख्या

स्वातंत्र्याची विरूप व्याख्या

रशियामधे, मॉस्कोमधे, साठेक हजार नागरिकांनी निदर्शनं केली. पोलिसांना त्यांना बदडलं. सुमारे १५०० निदर्शकांना तुरुंगात डांबलं. मॉस्कोमधे आणि रशियात निदर्शनं करायची असतील, मोर्चे काढायचे असतील तर सरकारची परवानगी घ्यावी लागते, मंजुरी घ्यावी लागते. वरील निदर्शनांना मंजुरी नव्हती असं रशियन सरकारचं म्हणणं आहे. मॉस्कोमधे झालेली निदर्शनं ही एकटीदुकटी घटना नव्हती.  रशियात आणखी डझनभर ठिकाणी तरी नागरिकांनी आपला असंतोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि सरकारनं तो दडपला. मॉस्कोमधल्या निदर्शकांची मागणी होती की होऊ घातलेल्या मॉस्को पालिकेच्या / विधानसभेच्या निवडणुकीत  स्वतंत्र उमेदवारांना उभं रहाण्याची…

Read More Read More

काश्मिर. उघड्यापाशी नागडं गेलं….

काश्मिर. उघड्यापाशी नागडं गेलं….

 फाळणी झाली तेव्हां काश्मिरची भारतातला काश्मिर आणि पाकिस्तानातला काश्मिर अशी अनौपचारीक विभागणी झाली. अख्खा काश्मिर कोणाचा हा प्रश्न वादाचा झाला, युनोत पोचला, लोंबकळू लागला. या स्थितीत काश्मिरातल्या गोंधळलेल्या जनतेला दिलासा मिळावा म्हणून विशेष दर्जा दिला गेला.   ।। काश्मिरला आता कोणतेही विशेष अधिकार शिल्लक राहिलेले नाहीत. भारतातल्या कोणत्याही राज्यासारखं ते एक राज्य झालंय. राज्य म्हटल्यावर  अधिकार आणि कारभाराचं स्वातंत्र्य मिळतं ते मात्र इथून पुढं जम्मू, काश्मीर आणि लदाखला मिळणार नाही. काश्मिर आता केंद्रशासित प्रदेश होणार आहे, त्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण…

Read More Read More

लोकशाह्या कशा मरतात

लोकशाह्या कशा मरतात

डोनल्ड ट्रंप अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले. प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना ट्रंप यांच्यापेक्षा २५ लाख मतं जास्त मिळाली होती. म्हणजे ट्रंप यांच्यापेक्षा किती तरी जास्त लोकांनी क्लिंटनना अध्यक्ष ठरवलं होतं. असं काही तरी होईल याची ट्रंप यांना जवळजवळ खात्रीच होती. त्यामुळं ते प्रचार मोहिमेतच सांगून बसले होते की  निकाल त्यांच्या विरोधात लागला तर तो ते निकाल मान्य करणार नाहीत. एलेक्टोरल कॉलेजच्या निवड पद्धतीमुळंच ट्रंप प्रेसिडेंट झाले, ट्रंपनाही आपण निवडून आलो याचं आश्चर्य वाटलं होतं. ट्रंप यांना प्रेसिडेंट होऊन अमेरिकेचं कल्याण करायचंच नव्हतं….

Read More Read More