Browsed by
Month: October 2023

रविवारचा लेख. चित्ते कां मेले?

रविवारचा लेख. चित्ते कां मेले?

२०२२ साली सप्टेंबर महिन्यात भारतात चित्ते आणले तेव्हां खूप गाजावाजा झाला.  काय झालं त्या चित्त्यांचं?  पहिली नामिबियन चित्यांची बॅच १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात पोचली. त्यात ८ चित्ते होते. नंतर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आणखी १२ चित्ते द. आफ्रिकेतून आयात करण्यात आले. एकूण चित्त्यांची संख्या २० झाली. त्यातले ९ चित्ते वारले.  एका मादी चित्त्याला ४ पिल्लं झाली. त्या पैकी तीन वारली. एक शिल्लक आहे. त्या पिल्लाची काळजी घेतली जातेय, त्याला छोट्या मुलाला जसं हातावर वाढवतात तसं वाढवलं जात आहे.  म्हणजे…

Read More Read More

सिनेमा. शोक. Nauha.

सिनेमा. शोक. Nauha.

Nauha. यू ट्यूब.   २०२३च्या कॅनमधल्या La Cinef स्पर्धेत मुंबईच्या प्रथमेश खुराणा याची Nauha (शोक) ही फिल्म दाखवली गेली. ही स्पर्धा सिने शाळात शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरवली जाते. २०२३ च्या स्पर्धेत जगभरच्या ४७६ सिनेशाळांमधून २००० अर्ज आले होते. पैकी १६ स्पर्धक विद्यार्थ्यांच्या फिल्म्सची निवड करण्यात आली. त्यात प्रथमेश खुराणाची फिल्म होती. प्रथमेश खुराणा दिल्लीतल्या व्हिसलिंग सिनेकला शाळेचे विद्यार्थी आहेत. नौहा २८ मिनिटांची आहे. छोटी फिल्म या प्रकाराचं वैशिष्ट्यंच असं की एकादा मुद्दा घेऊन ती फिल्म विकसित होते. पूर्ण लांबीची फीचर…

Read More Read More

रविवारचा लेख भारताची गोची

रविवारचा लेख भारताची गोची

सात ऑक्टोबर रोजी हमासनं इसरायलवर केलेल्या हल्यानंतर लगोलग ‘या कठीण समयी आम्ही इसरायल बरोबर आहोत’ असं वक्तव्य भारताच्या पंतप्रधानांनी ट्विटरवर प्रसृत केलं. बारा ऑक्टोबर रोजी भारताच्या परदेश विभागानं ‘निष्पाप नागरिकांवर बेछूट हिंसक हल्ले करण्याचं समर्थन, मग ते हल्ले इसरायलच्या सैन्याचे असोत वा हमासनं केलेले असोत, होऊ शकत नाही. अशी हिंसा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असून तो एक युद्ध गुन्हा ठरतो.’ असं अधिकृत वक्तव्य प्रसृत केलं. पंतप्रधानांनी इसरायलला एकतरफी पाठिंबा जाहीर करणं आणि नंतर पाच दिवसांनी देशाच्या परदेश खात्यानं पंतप्रधानांच्या विधानाशी विसंगत…

Read More Read More

पुस्तक वेस्ट बँकमधलं वास्तव

पुस्तक वेस्ट बँकमधलं वास्तव

A DAY IN THE LIFE OF ABED SALAMA NATHAN THRALL Metropolitan Books Pages 272 || गाझातल्या हमासनं इसरायलवर हल्ला केला. खूप इसरायली मारले. चवताळलेल्या इसरायलनं गाझावर हल्ला केला. खूप पॅलेस्टिनी मारले.  पॅलेस्टिनी आणि इसरायल यांच्यातलं भांडण १९४८ पासून सुरु होतं. पॅलेस्टाईन या विभागात इसरायल हा देश स्थापन झाला, जगभरातले ज्यू तिथं आले. ही स्थापना सामोपचारानं घडली नाही. इसरायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. १९४८ पासून ते थेट २०२३ पर्यंत इसरायली लोकांनी स्थानिक पॅलेस्टिनींना बेघर करत जमीन बळकावली. आज ८५ टक्के…

Read More Read More

रविवारचा लेख चांद्रयान मोहिम

रविवारचा लेख चांद्रयान मोहिम

चांद्रयान ३ या मोहिमेच्या तहत २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर उतरलं. विक्रम, विक्रमला जोडलेली प्रग्यान ही गाडी, दोघंही चंद्रावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरलं. या ध्रुवावर उतरलेलं हे पहिलंच यान होतं. अमेरिका, रशिया आणि चीनची यानं चंद्रावर उतरली आहेत, पण या ध्रुवावर नाही, कारण हा प्रदेश अजून माणसाला उमगलेला नाही. तिथलं हवामान, तिथली जमीन कशी आहे याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळं किती सुरक्षित पोचता येईल  त्याची कल्पना कोणालाच नव्हती. विक्रम उतरलं. व्यवस्थित उतरलं. तिथल्या मुक्कामात एकदा त्या यानानं उडीही मारली.यान…

Read More Read More

सिनेमा. ऑस्करसाठी मल्याळी २०१८

सिनेमा. ऑस्करसाठी मल्याळी २०१८

येत्या म्हणजे २०२४ च्या ऑस्करसाठी 2018. Every One is a Hero ही मल्याळी फिल्म निवडण्यात आलीय.   ‘२०१८’ मधे केरळातल्या एका गावाची गोष्ट आहे. एक कुठलंही असावं असं एक गाव असतं. माणसं आपापल्या अस्तित्वासाठी धडपडत असतात. माणसंच ती. त्यांची सुखदुःख, त्यांचे ताणतणाव, त्यांची भांडणं असं सारं काही जसं कुठंही असावं तसं गावात असतं. पूर येतो. अन्यथा लडखडणारी माणसं घट्ट पाय रोवून उभी रहातात, आपापले स्वार्थ आणि हेवेदावे विसरून पुराला तोंड देतात.अनूप नावाचा एक फौजी माणसं मारली जातात त्यानं व्यथित होऊन…

Read More Read More

इसरायल पॅलेस्टीन संघर्षाची पाळंमुळं आणि पानंफांद्या.

इसरायल पॅलेस्टीन संघर्षाची पाळंमुळं आणि पानंफांद्या.

सहा ऑक्टोबरपर्यंत गाझामधून १७ हजार पॅलेस्टिनी इसरायलमधे येत होते. दररोज.कामधंदा करण्यासाठी. सात ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेनं इसरायलवर हल्ला केला. रॉकेटं सोडली, सैनिक इसरायलमधे घुसवले. साताठशे माणसं मारली, दोनतीनशे माणसं ओलीस ठेवली. आठ ऑक्टोबरपासून इसरायलनं आपलं पायदळ आणि रणगाडा दळ गाझात घुसवून गाझा जमीनदोस्त करायला सुरवात केली. नऊ ऑक्टोबरपासून गाझामधल्या माणसांना इसरायल प्रवेश बंद करेल. गाझाची पूर्ण नाकेबंदी होईल.बाहेरून कोणतीही मदत गाझात पोचणं इसरायल अशक्य करेल. सोळाव्या, सतराव्या शतकात किल्ल्याला वेढा घालून किल्ल्यातल्या माणसांना उपाशी मारण्याची एक लढाईची पद्धत…

Read More Read More

रविवारचा लेख. पॅलेस्टिनी लोकांनी हा आत्मघातकी मार्ग कां पत्करला

रविवारचा लेख. पॅलेस्टिनी लोकांनी हा आत्मघातकी मार्ग कां पत्करला

सात ऑक्टोबरला गाझा पट्टीतून पाचेक हजार रॉकेटं निघाली आणि इसरायलमधे कोसळली. काही शेकडा पॅलेस्टिनी कमांडो पारंपरीक (अत्याधुनिक नसलेल्या) बंदुका घेऊन इस्रायलमधे घुसले. ते आल्यावर स्थानिक पोलीस आणि सैनिक जीव घेऊन पळत सुटले, लढले नाहीत. काही डझन सैनिक आणि इस्रायली नागरिकांना या कमांडोनी ओलिस ठेवलं. हँडग्रेनेड आणि आयईडी  ओलिसांच्या अंगावर लावलेले होते, याद राखा, कारवाई केली तर तुमची माणसं उडवून देऊ. असं काही घडेल याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती.  इसरायलची मोसाद आणि शिन बेट ही इंटेलिजन्स यंत्रणा जगातली सर्वात कार्यक्षम…

Read More Read More

पुस्तक. लोकशाही वांध्यात आहे

पुस्तक. लोकशाही वांध्यात आहे

लोकशाही वांध्यात आहे.  लोकशाही वांध्यात आहे. लोकशाही भांडवलशाहीचं लग्न डळमळीत आहे. असं ब्रिटीश पत्रकार मार्टिन वोल्फ यांचं मत आहे. खरं म्हणजे मत नसून तो इशारा आहे. हा इशारा त्यांनी The Crisis of Democratic Capitalism या त्यांच्या ताज्या पुस्तकात दिला आहे. वोल्फ फायनॅन्शियल टाईम्स या प्रतिष्ठित पेपरात स्तंभ लिहितात. त्या पेपरात ते काही काळ संपादक होते. वोल्फ मुख्यतः आर्थिक विषयावर लिहितात. काही काळ ते विश्व बँकेतही होते. वोल्फ यांच्या मताची दखल अमेरिकेत आणि ब्रीटनमधे गांभिर्यानं घेतली जाते. प्रस्तुत पुस्तक हे त्यांचं पाचवं…

Read More Read More

रविवारचा लेख गुन्हे सिद्ध तरी ट्रंप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत

रविवारचा लेख गुन्हे सिद्ध तरी ट्रंप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत

डोनल्ड ट्रंप २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार होणार आहेत, त्या प्रचार मोहिमेत ते हिंडत असताना त्याच्यावरच्या दोन निकाल लागले. सप्टेंबर २३ च्या शेवटल्या आठवड्यात न्यू यॉर्क कोर्टानं अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंपनी आर्थिक फ्रॉड केला असा आरोप सिद्ध करून २५ कोटी डॉलरचा दंड केला. ही केस उभी राहू नये यासाठी ट्रंप यांनी जंग जंग पछाडलं. पण न्यायालयानं चिकाटीन खटला पार पाडला. आरोप असा. ट्रंप फायद्याचं असेल तेव्हां त्यांच्या मालमत्तेचा आकार आणि किमत फुगवत. मारे लागो, न्यू यॉर्कमधल्या प्रॉपर्टी, किंमत होती…

Read More Read More