Browsed by
Month: September 2020

कोविड, ट्रंप आणि वुडवर्ड यांचं नवं पुस्तक

कोविड, ट्रंप आणि वुडवर्ड यांचं नवं पुस्तक

Rage Bob Woodward Simon & Schuster || बॉब वुडवर्ड यांच्या १९ पुस्तकांपैकी किमान १० पुस्तकं तरी त्या त्या वेळी बेस्ट सेलर च्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिली आहेत. प्रस्तुत रेज हे पुस्तक त्या परंपरेला अपवाद नाही. वुडवर्ड बातमीदार आहेत. एकादी बातमी ते घेतात, तिला चिकटतात आणि त्या बातमीतलं बातमीपण संपेपर्यंत त्या बातमीचा पिच्छा सोडत नाहीत. १९७२ सालच्या जून महिन्यात चार दरोडेखोर वॉटरगेट या इमारतीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या कचेरीत घुसले या घटनेच्या बातमीला वुडवर्ड चिकटले आणि १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात प्रे. निक्सन यांना…

Read More Read More

अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारी चलाखी

अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारी चलाखी

कोविडनं निर्माण केलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सरकारनं छोट्या उद्योगांना ३ लाख कोटींचं कर्ज देऊ केलं आहे. हे कर्ज कमी व्याजाचं असेल.कल्पना अशी की हे पैसे बंद पडलेल्या उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊन व इतर देणी भागवून व कच्चा माल इत्यादीत गुंतवून पुन्हा उद्योग सुरु करावेत. चौकशी केल्यानंतर जे समजतं ते विचित्र आहे. बँकांनी वरील पैसा उद्योगांना दिला खरा पण त्यांच्यापैकी बहुतांश लोकांनी तो पैसा आपली जास्त व्याजाची कर्जं फेडण्यासाठी वापरला, उद्योग सुरु करण्यासाठी नाही. म्हणजे सरकारनं जुनं नवं केलं.  सहकारी…

Read More Read More

बोेहेमियन चित्रपट दिक्दर्शक यिरी मेंझेल

बोेहेमियन चित्रपट दिक्दर्शक यिरी मेंझेल

यिरी मेंझेल हा झेक दिग्दर्शक नेटकाच वयाच्या ८२ वर्षी वारला. त्याच्या क्लोजली वॉच्ट ट्रेन्स या चित्रपटाला १९६६ साली ऑस्कर मिळालं होतं.  भारतात परदेशी चित्रपट खूप कमी पाहिले जातात, झेकोस्लोवाकिया नावाचा देश आहे हेही माहित नसलेले लोक फार. त्यामुळं यिरी मेंझेलनं केलेले चित्रपट भारतीय माणसाला परिचित नाहीत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पहाणाऱ्या प्रेक्षकांना मेंझेल फार आवडला होता. क्लोजली वॉच्ट ट्रेन्स . अगदीच आडवाटेला असलेलं रेलवे स्टेशन. दिवसातून तीन चार डब्यांची एकादी गाडी येते जाते. तिच्यातून चार दोन माणसांची चढउतार होते. स्टेशनात सगळी…

Read More Read More

प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन. सर्वांना मतं हवीयत.

प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन. सर्वांना मतं हवीयत.

खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे डॉ. आंबेडकरांचे अनुयायी.  त्यांना देवाधर्माबद्दल आस्था असण्याची अपेक्षा नाही. मतदार, हिंदू पंथ मानणारे, आपल्याकडं यावेत यासाठी त्यांनी पंढरपूरचं मंदीर उघडावं यासाठी  सत्याग्रह केला. काही तासांचाच. हज्जारो माणसं गोळा केली.  अपेक्षेप्रमाणं सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व यथावकाश विचार करून मंदीराचे दरवाजे उघडू असं सांगितलं. लॉकडाऊन हळूहळू कधी तरी उघडायचं होतंच, त्या वेळापत्रकात पंढपुरच्या विठोबाला सरकारनं घातलं. येवढंच.  प्रकाश आंबेडकर आणि सरकार, दोघंही खुष. प्रकाश आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळी लोकं अंतर बाळगणं, मास्क लावणं इत्यादी गोष्टींकडं पूर्ण…

Read More Read More