Browsed by
Month: September 2019

लोकशाहीचं मातेरं

लोकशाहीचं मातेरं

ब्रिटीश संसद दीर्घ काळ बरखास्त करण्याचा बोरिस जॉन्सन यांचा  निर्णय ब्रीटनच्या सर्वोच्च न्यायालयानं बेकायदेशीर, निराधार, अनावश्यक ठरवून रद्द केला.    संसदेचं कामकाज किती दिवस चालवायचं, केव्हां स्थगित करायचं, संसद बरखास्त करून निवडणुका केव्हा घ्यायचा हे निर्णय सरकारचा अधिकार असतो. राणीनं शिक्का मोर्तब केल्यानंतर तो निर्णय अमलात येत असतो. प्रधान मंत्री राणीला (किंवा राजाला-मोनार्क) सल्ला देतो. राणीला ब्रिटीश परंपरांचे जाणकार, प्रीवीकाऊन्सीलचे सदस्य सल्ला देतात.  राणीच्या संमतीनं निर्णय घेण्याची प्रथा ब्रिटीश लोकशाहीत आहे. राणीला सल्ला मान्य नसेल तर  राणी खाजगीत चर्चा करते,…

Read More Read More

शेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत?

शेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत?

    २०१८ साली महाराष्ट्रात २७६१ शेतकऱ्यांनी अकाली मरण पत्करलं, भारतात  सुमारे १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.   भारतात १२.५६ कोटी मध्यम व छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडं सरासरी जास्तीत जास्त जमीन दोन हेक्टर आहे. बहुतेक शेतकरी भुसार पिकं काढतात, कोरडवाहू शेती करतात. सरासरी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च (दोन हेक्टरसाठी) १० हजार रुपये होतो. त्याचं सरासरी उत्पन्न २०,४०० रुपये होतं. म्हणजे वर्षाकाठी त्याला सुमारे १० हजार रुपये खर्चायला मिळतात. त्यामधे त्यानं शिक्षण, आरोग्य, लग्न, सण, करमणुक इत्यादी गोष्टी सांभाळायच्या. मशागत, पेरणी, कापणी,…

Read More Read More

ट्रंप यांचा ट्वीटखेळ

ट्रंप यांचा ट्वीटखेळ

आठ सप्टेंबरच्या पहाटे सव्वाचार वाजता प्रेसिडेंट ट्रंपनी ट्वीट करून जाहीर केलं की आपण कँप डेविड (अमेरिका) येथे होणारी तालिबान पुढाऱ्यांबरोबरची बैठक रद्द केलीय. ट्रंपनी म्हणे तालिबानच्या पुढाऱ्यांना कँप डेविडमधे बोलावून घेतलं होतं. ट्रंप यांचं ट्वीट प्रसारित झालं तेव्हां अमेरिका झोपेत होती, व्हाईट हाऊस, पेंटॅगॉन, सुरक्षा सल्लागार, सीआयएचे लोक इत्यादी सगळी जनता झोपेत होती. जाग आल्यावर त्यांना कळलं की ट्रंप तालिबानच्या पुढाऱ्यांबरोबर एक बैठक करणार होते. अमेरिकन सरकार, अमेरिकन लष्कर, अमेरिकन परदेश खातं अशा सगळ्याच ठिकाणची माणसं ट्रंप यांच्या ट्वीटनं बुचकळ्यात…

Read More Read More

गंभीर आर्थिक संकट

गंभीर आर्थिक संकट

जुलै २०१९ मधे केंद्र सरकारनं बजेट मांडलं. मांडत असताना आणि मांडून झाल्यावर स्पष्ट झालं की सरकारला करांतून अपेक्षित असलेला १९.७८ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला नाहीये. जमा झाले होते १५.९ लाख कोटी रुपये. सरकारला मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात जीएसटी हा एक महत्वाचा घटक असतो. जुलै महिन्यांपर्यंत जीएसटीतून  अपेक्षेपेक्षा ४० हजार कोटी रुपये कमी मिळाले. महसूल कमी म्हणजे मोठीच अडचण. खर्च कुठून करायचा? तूट कशी कमी करायची? पैसे कुठून आणायचे? फेब्रुवारीत संकटाची चाहूल लागल्यावर सरकारनं  २८ हजार कोटी रीझर्व बँकेकडून घेतले….

Read More Read More