पुस्तकं/जिवाची किंमत मोजून लढणारी पत्रकार.
।। लेखिका मारिया रेसा १९२१ सालच्या शांतता नोबेल पारितोषिकाच्या मानकरी आहेत. पत्रकारीतल्या कामगिरीसाठी त्यांना नोबेल देण्यात आलंय. मारिया रेसा जन्मानं फिलिपिनो आहेत, त्यांची वाढ आणि आणि शिक्षण अमेरिकेत झालंय. सध्या त्या अमेरिका आणि फिलिपिन्स या दोन्ही ठिकाणी जाऊन येऊन असतात. फिलिपिन्समधे त्या खटले आणि खुनाच्या धमक्यांना तोंड देत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या तीन धड्यांत लेखिकेनं जन्मापासून पत्रकारीची सुरवात करेपर्यंतची हकीकत मांडली आहे. चौथ्या धड्यापासून त्यांनी केलेली पत्रकारी कामगिरी सुरू होते. तेही एका परीनं लेखिकेचं आत्मकथनच आहे. पुस्तकात सर्वात शेवटी लोकशाही…