Browsed by
Month: May 2019

वंशद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर

वंशद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर

कारचा गोरा ड्रायव्हर आणि काळा मालक यांच्यातलं घट्ट होत गेलेलं मैत्रीचं नाट्य दाखवणारा ग्रीन बुक यंदा सर्वोत्तम ऑस्कर चित्रपट ठरला.  सहायक अभिनेता (माहेरशाला अली) आणि पटकथेचीही ऑस्कर चित्रपटाला मिळाली.  १९६० च्या दशकातलं कथानक आहे. डोनल्ड शर्ली हा काळा नामांकित संगीतकार अमेरिकेत वर्णद्वेषासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांचा दौरा काढतो, त्यासाठी टोनी लिप या गोऱ्या माणसाला ड्रायव्हर कम सहाय्यक म्हणून पगारी नोकर म्हणून ठेवतो. शर्ली एका प्रतिष्ठित सुस्थित काळ्या घरात वाढलेला भरपूर शिकलेला आणि अत्यंत ऊच्चवर्णीय गोऱ्या संस्कृती व शिष्टाचारात वाढलेला माणूस असतो….

Read More Read More

विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

रघूराम राजन यांचं थ्री पिलर्स हे पुस्तक म्हणजे राज्यशास्त्र, अर्थ शास्त्र या विषयांची एक सहल आहे. राज्य (स्टेट), बाजार आणि समुदाय या समाजाच्या तीन घटकांचा इतिहास, त्यांची आजची स्थिती यांचा एक दीर्घ आढावा राजन यांनी घेतला आहे. बाजार,तंत्रज्ञान याचा संबंध राज्याशी येतो आणि हे दोन घटक मिळून समुदाय, समाज घडवतात. गेल्या वीसेक वर्षात तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यामुळं खूप बदल घडले असून त्यामुळं समुदाय हा घटक मोडकळीला आला, विस्कटला आहे. तेव्हां समुदाय (community)सुदृढ व्हावा यासाठी काय करता येईल याचा विचार राजन…

Read More Read More

जेसिंडा आरर्न, बंडखोर प्रधानमंत्री.

जेसिंडा आरर्न, बंडखोर प्रधानमंत्री.

जेसिंडा आरर्न न्यू झिलंडच्या प्रधान मंत्र्यांनी (वय ३८ वर्षे) आत्ता आत्ता म्हणजे एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यांच्या नवऱ्याचं नाव क्लार्क गेफर्ड. गेफर्ड एक टीव्ही कार्यक्रम करतात. कार्यक्रमाचं नाव आहे, एक मासा एक दिवस. जेसिंडा आणि त्यांची बऱ्याच वर्षापासूनची ओळख आहे. या लग्नानं न्यू झीलंड आणि युकेमधल्या लोकांच्या भुवया वर गेल्या. कारण क्लार्क हा त्यांचा चार पाच वर्षांपासूनचा अधिकृत मित्र आहे, दोघं एकत्र रहात होते. २०१८ साली जून महिन्यात जेसिडांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाचा पिता होता गेफर्ड. म्हणजे लग्न न…

Read More Read More

देव धर्म एक टाईमपास

देव धर्म एक टाईमपास

कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही अशी एक म्हण आहे. तरीही कावळे आणि माणसं शाप देतच असतात. गायी तर मरतातच,  वृद्ध होऊन किंवा रोग झाल्यानं किंवा कुपोषणामुळं. शाप देणारा मात्र स्वतःवर खुष होतो, आपल्या शापानं गाय मेली असं म्हणून समाधान पावतो. माणसाचा तळतळाट होतो तेव्हां माणूस त्रास देणाऱ्या माणसाचं तळपट होवो, त्याचं वाईट्ट वाईट्ट होवो असं म्हणतो. ती एक व्यक्त झालेली चीड असते. पण प्रज्ञा ठाकूर नावाची महिला लोकसभेची निवडणुक लढवतांना करकरे हा पोलिस अधिकारी आपल्या शापानं मेला असं म्हणते तेव्हा…

Read More Read More

लंकेतला दहशतवाद

लंकेतला दहशतवाद

२१ एप्रिलला लंकेत आठ ठिकाणी स्फोट झाले आणि त्यात २६० माणसं मेली. स्फोट चर्चमधे आणि हॉटेलांत झाले. ईस्टर संडेच्या सणाच्या प्रार्थनेसाठी जमलेली माणसं मेली. एक चर्च सर्वधर्मीय चर्च म्हणून ओळखलं जातं. तिथं मुस्लीम, हिंदू, बौद्ध माणसंही प्रार्थनेसाठी जमली होती. स्फोटात गुंतलेले दोघं होते  इल्हाम इब्राहीम आणि इन्शाफ अहमद हे दोन भाऊ. पाठीवर स्फोटकं घेऊन ते चर्चमधे पोचले आणि स्फोट घडवून आणला. तौहिद जमात ही जिहादी संघटना लंकेत खटपटी करत होती हे लंकेच्या पोलिसांना माहित होतं. किरकोळ स्फोट आणि पुतळे उध्वस्थ…

Read More Read More