Browsed by
Month: May 2018

महाराष्ट्रातील शेती, शेतकरी,पाणी समस्या आणि पाणी फाऊंडेशन

महाराष्ट्रातील शेती, शेतकरी,पाणी समस्या आणि पाणी फाऊंडेशन

आमिर खान यांचं पाणी फाऊंडेशन सध्या गाजतय. अनेक गावांमधे शेतकऱ्यांना पाणी अडवायला, पाणी साठवायला पाणी फाऊंडेशन प्रेरित करत आहे.  आमिर खान यांना चित्रपट कला चांगलीच अवगत असल्यानं आणि  त्याना टाटा, अंबानी, महाराष्ट्र सरकार यांचाही पाठिंबा असल्यानं त्यांचा तुफान आलंया हा कार्यक्रम गाजतोय. पाणी फाऊंडेशननं खेड्यात पाणी जिरवा, पाणी वाचवा ही मोहीम सुरू केलीय, जलसंधारणाची कामं सुरु केलीत. गावातल्या लोकांनी श्रमदान करून, प्रसंगी कामासाठी आवश्यक डिझेल इत्यादी गोष्टी वर्गणी करून कामं पार पाडली. फाऊंडेशन खेड्यातल्या लोकांना तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देतं. पैसे…

Read More Read More

इराण अणुकरार मोडणं म्हणजे काय

इराण अणुकरार मोडणं म्हणजे काय

इराणबरोबर २०१५ साली झालेल्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून अमेरिकेनं काढता पाय घेतला आहे. काय होता हा करार? अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, युके, रशिया, चीन या देशांच्या सहमतीनं झालेल्या या करारानुसार इराणनं  तयार केलेली अणुव्यवस्था  अणुशस्त्र निर्मितीकडं (वॉरहेड्स) वळवायची नाही आणि त्या दिशेनं तयार केलेली उभारणी विघटित करायची.  इराण कराराचं पालन करत आहे की नाही हे पहाण्यासाठी आंतरराष्ट्रीय, तटस्थ निरीक्षक इराणमधे पाठवले जातील व त्यांना तपासणीसाठी मुक्त वाव असेल असंही करारात ठरलं होतं. या बदल्यात अमेरिका  इत्यादी देशांनी इराणवर लादलेले निर्बंध काढून घ्यायचे असं…

Read More Read More

अजूनही जगात परक्यांना शत्रू न मानणारी माणसं आहेत

अजूनही जगात परक्यांना शत्रू न मानणारी माणसं आहेत

साजिद जाविद ब्रीटनचे गृहमंत्री झाले आहेत. त्यांच्यामुळं गोरा नसलेला पहिला आशियाई माणूस ब्रीटनमधे गृहमंत्री झाला आहे. जाविद यांचे आई वडील मुळचे भारतीय. नंतर ते पाकिस्तानात गेले. तिथून ते साठच्या दशकात ब्रीटनमधे स्थलांतरीत झाले. त्यांचे वडील बस ड्रायव्हर होते, आहेत.  राजकारणात येण्यापूर्वी ते इनवेस्टमेंट बँकर होते. जाविद तेरेसा मे यांचे समर्थक आहेत, उजवे सनातनी आहेत. गृहमंत्री होण्याआधी त्यांनी घरबांधणी, सांस्कृतीक या खात्यांच्या मंत्रीपदी काम केलं आहे. गृहमंत्रीपद त्यांना सहजासहजी मिळालेलं नाही. आधीच्या गृहमंत्री अँबर रड यांना स्थलांतरीतांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करणं या…

Read More Read More

रजनीशांना अमेरिकेनं कां हाकलून दिलं?

रजनीशांना अमेरिकेनं कां हाकलून दिलं?

ओशो ऊर्फ आजार्य रजनीश यांचं  निधन होऊन पाव शतक होऊन गेलंय.  त्यांच्या पुस्तकांचे ४० भाषांत अनुवाद प्रसिद्ध होत आहेत, पुस्तकं आणि व्हिडियो जगभर  लाखोनी खपत आहेत, त्यांच्या अनुयायांचे आश्रम जगभर उभे रहात आहेत, अनुयायांची संख्या वाढत आहे. जिवंतपणी त्यांना खूप विरोधक होते, आता विरोधकांची संख्या मावळते आहे. . ओशो कां वादग्रस्त होते याचा काहीसा पत्ता नेटफ्लिक्सनं प्रदर्शित केलेल्या डॉक्युमेंटरीतून लागतो. डॉक्युमेंटरीचं नाव आहे वाईल्ड वाईल्ड कंट्री. प्रत्येकी एक तासाचे सहा भाग. मुख्यतः ओशोंच्या १९८१ ते १९८५ या काळातील अमेरिकेतील ओरेगन…

Read More Read More