Browsed by
Month: March 2023

१९३० सालचा चित्रपट. आजही आवडतो.

१९३० सालचा चित्रपट. आजही आवडतो.

‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट ‘  १९३०. हां. विषय  २०२३ साली ऑस्कर मिळवलेल्या ‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट ‘ चा नाहीये. विषय आहे  १९३० साली झालेल्या ‘ऑल दी क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’ चा. दोन्ही फिल्मचं कथानक एकच आहे. ज्या पुस्तकावरून चित्रपट रचलाय ते पुस्तकही एकच आहे. फक्त चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट वेगळी आहे, चित्रपटाची हाताळणी आणि शैली वेगळी आहे. पॉल, कॅट व इतर तरूण राष्ट्रवादानं भारून जातात, युद्धावर जातात. पॉल, कॅट (व इतर १.७ कोटी माणसं)…

Read More Read More

 ‘ स्टिल पिक्चर्स’  हे जेनेट माल्कम या गाजलेल्या लेखिका-बातमीदार यांचं आत्मचरित्र आहे.   माल्कमनी १९६३ साली न्यू यॉर्करमधे लिहायला सुरवात केली आणि मृत्यूपर्यंत म्हणजे २०२१ सालापर्यंत त्या न्यू यॉर्करमधे लिहित होत्या. त्यांची १३ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.त्यांचं JOURNALIST AND THE MURDERER हे पत्रकारी या विषयावरचं पुस्तक गाजलं, अमेरिकेत ते पत्रकारी अभ्यासक्रमामधे शिकवलं जातं.  जेनेट माल्कम झेक ज्यू होत्या. बुडापेस्टमधे त्या रहात.वडील यशस्वी डॉक्टर होते. माल्कम यांचं कुटुंब सुखी होतं. नाझी अत्याचार सुरू झाल्यावर १९३९ साली त्यांचं कुटुंब अमेरिकेत स्थलांतरीत झालं….

Read More Read More

पुस्तकं. सम्राट अलेक्झांडर. दंतकथा.

पुस्तकं. सम्राट अलेक्झांडर. दंतकथा.

आज २०२३ या सालात ग्रीक-मॅसिडोनियन सम्राट अलेक्झांडरच्या  मृत्यूला २३०० वर्षं झाली. अजूनही ॲलेक्झांडरवर संशोधक पुस्तकं लिहीत आहेत. Alexander the Great:The Making of a Myth हे पुस्तक नुकतंच म्हणजे २०२२ साली Richard Stoneman या संशोधकांनी संपादित केलंय.  लंडनमधल्या ब्रिटीश म्युझियमनं अलेक्झांडरची पुण्यतिथी हेरून महिनाभराचा उत्सव आखला होता त्यासाठी मुद्दा हे पुस्तक संपादित करण्यात आलं. म्युझियमनं २५ देशातून विविध वस्तू, शिल्पं, चित्रं इत्यादी गोळा केली; ॲलेकबद्दलची २१ भाषांतली पुस्तकं गोळा करून प्रदर्शनात मांडली गेली. पुस्तकात नामांकित संशोधकांचे लेख एकत्रीत केलेले आहेत. खुद्द…

Read More Read More

ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत. 

ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत. 

ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत.    २०२३ च्या ऑस्कर स्पर्घेक लिविंग या चित्रपटाला ॲडॉप्टेड पटकथा आणि अभिनय या वर्गांत नामांकनं मिळालीत. अभिनय William Nighy यांचा आहे आणि पटकथा Kazuo Ishiguro यांनी लिहिलीय. नाई यांना अभिनयाचं पारितोषिक मिळायला हरकत नाही. या चित्रपटामागं बराच इतिहास आहे. १८८६ साली टॉलस्टॉयनी The Death of Ivan Ilych या नावाची एक छोटी कादंबरी लिहिली होती. या कथेतून प्रेरणा घेऊन अकिरा कुरोसावा या जपानी दिक्दर्शकानं १९५३ साली इकुरू (Ikuru-जगणं-to live) या नावाचा चित्रपट केला. इकुरुचीच गोष्ट…

Read More Read More

ऑस्कर २०२३. ब्लाँड. मेरिलिन मन्रो. भरपूर सेक्स, विचार करायला लावतो.

ऑस्कर २०२३. ब्लाँड. मेरिलिन मन्रो. भरपूर सेक्स, विचार करायला लावतो.

ऑस्कर २०२३. ब्लॉंड.  यंदाच्या ऑस्करमधे अभिनयाचं नामांकन आहे. चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे. मेरिलीन मन्रो या गाजलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीची शोकांतिका. मेरिलीन मन्रो ही हॉलीवूडमधली एक गाजलेली अभिनेत्री. तिचा अभिनय यथातथाच असे पण ती दिसत असे खास. मादक सौंदर्य. १९५०-६० च्या दशकात हॉलीवूडमधले सिनेमे भारतात फारसे पहायला मिळत नसत. तरीही मन्रो भारतात  लोकप्रीय होती.  मन्रोचा जन्म १९२६ साली,१९६२ साली अती ड्रग सेवनानं  मृत्यू.   दहा बारा वर्षाचं फिल्मी लाईफ म्हणजे फार नव्हे. तरीही मन्रो गाजली,  तिच्या सेक्सी सिग्नेचर प्रतिमेनं अमेरिकेला वेड लावलं. रस्त्यावर…

Read More Read More