Browsed by
Month: March 2020

करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला.

करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला.

करोना संकट पूर्वार्ध करोना संकटानं सारं जग हादरलय. सारं जग आपापल्या अर्थव्यवस्था तपासून पाहू लागलं आहे. अमेरिका आणि युरोपीय देश मानत होते की त्यांचं उत्तम चाललंय. चीनही तसंच मानत होता. आपापल्या अर्थव्यस्था उत्तम आहेत आणि आपापले अर्थविचार एकदम फिट आहेत असं ते सर्व मानत होते. करोना व्हायरसनं त्या सर्वांचे तीन तेरा वाजवलेत. त्यांच्या अर्थव्यवस्था संकट सहन करण्यास लायक नव्हत्या हे त्यांच्या लक्षात आलंय. करोना संकट उभं रहायच्या वर्षभर आधी अमेरिकेत सुमारे १.२ कोटी माणसांना पुरेसं वेतन वा उत्पन्न मिळत नव्हतं….

Read More Read More

अन्यायमूर्तीना बक्षिसी

अन्यायमूर्तीना बक्षिसी

रंजन गोगोई यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली तेव्हा शेम शेम,शरम शरम, असे शब्द सभागृहात उमटले. कोण आहेत हे रंजन गोगोई. हे आहेत माजी सर न्यायाधीश. रंजन गोगोई यांनी कोर्टात काम करणाऱ्या स्त्रीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला.स्त्रीशी लैंगिक अथवा कोणतंही गैरवर्तन झालं तर  त्याची चौकशी निःपक्षपाती तटस्थांकडून  कशी करावी हे विशाखा कायद्यात सांगितलं आहे. हा कायदा सर्व संस्थाना लागू आहे.  न्या. गोगोई यांनी दोन न्यायाधिशाना घेऊन चौकशी केली. आरोपीच न्यायाधीश झाले. तक्रार केलेली स्त्री वा तिचा वकील यांना या चौकशी समितीसमोर…

Read More Read More

ट्रंप मोदी रिअॅलिटी शो

ट्रंप मोदी रिअॅलिटी शो

डोनल्ड ट्रंप यांना निवडून येण्यासाठी भारतीय मतांची आवश्यकता आहे.   ३०४ इलेक्टोरल मत देणारं टेक्सर राज्य पदरात पाडणं ट्रंपना आवश्यक आहे. टेक्ससमधे २.७ लाख भारतीय मतं आपल्या खिशात पडावीत यासाठीच ट्रंपनी तिथं हावडी मोदी कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध अमदाबादेत नमस्ते ट्रंप या कार्यक्रमानं घडवून आणला. ट्रंप भारतात येऊन गेले. भारतात येण्यापूर्वी भारतीय  माणसांना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आवश्यक व्हिसा तरतुदी त्यानी कडक करून भारतीयांना नाराज केलं. त्या तरतुदी सैल केल्याची घोषणा त्यांनी केली नाही. भारतीय मालावर त्यानी लावलेल्या जकाती…

Read More Read More

अमेरिका तालिबान शांतता करार. भोंगळ पळवाट.

अमेरिका तालिबान शांतता करार. भोंगळ पळवाट.

अमेरिकेनं तालिबानशी शांतता करार केला आहे. अमेरिकेच्या शत्रूना (आयसिस, अल कायदा) तालिबाननं अफगाणिस्तानात थारा दिला नाही, त्याना मदत केली नाही, हिंसक हल्ले बंद केले तर अमेरिकेची १८००० सैनिकांची फौज अमेरिका पुढल्या काही महिन्यात काढून घेणार आहे. आपल्या भूमीवर परकीय (अमेरिकन) सैनिक असता कामा नयेत असं तालिबानचं धोरण होतं आणि तालिबान अमेरिकन सैन्यावर हल्ले करत असे. करार अद्यात्मिक ढंगाचा आहे. तालिबान कराराचं पालन करेल याची हमी कोणी द्यायची? अफगाण सरकार तशी हमी द्यायला तयार नाही. कारण या करारात अफगाण सरकार नाहीये,…

Read More Read More