Browsed by
Month: September 2018

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक वॉटरगेट प्रकरण शोधून काढणाऱ्या बॉब वुडवर्ड यांचं ट्रंपांचे व्हाईट हाऊसमधले दिवस या विषयावरचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं. ट्रंप कसे निर्णय घेतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे यावर हे पुस्तक प्रकाशझोत टाकतं. ।। पुस्तकाच्या सुरवातीच्या पानावर बॉब वुडवर्डनी डोनल्ड ट्रंप यांचा एक वाक्यं अवतरलं आहे. Real power is ….fear. बळाचा वापर करून, धादांत खोटं बोलून, अवास्तव आणि प्रमाण नाकारणारी वक्तव्य करून समोरच्या माणसाला घाबरवणं हे ट्रंप यांचं वैशिष्ट्यं प्रस्तुत पुस्तकात पानोपानी प्रत्ययाला येतं. ट्रंपनी निवडणुक…

Read More Read More

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे माणसाची किमत तो किती पैसे मिळवतो यावरूनच करायची का? हा प्रश्न इराणमधून स्थलांतरीत झालेल्या रोया हक्कियन डोनल्ड ट्रंपांच्या अमेरिकेला विचारत आहेत. कारण ट्रंप बाहेरच्या माणसांना देशात घेताना त्यांची पैसे मिळवण्याची क्षमता ही कसोटी लावणार आहेत. वरील प्रश्न त्यांनी “Journey from the Land of No: A Girlhood Caught in Revolutionary Iran” या त्यांच्या ताज्या पुस्तकात उपस्थित केलाय. रोया हक्कियन एक कवयित्री आहेत. रोया १९८५ साली अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. खोमेनी यांचं धर्मराज्य इराणमधे…

Read More Read More

माणसं बेघर होताहेत

माणसं बेघर होताहेत

न्यू झीलँड सरकारनं बाहेरून येणाऱ्या लोकांना घरं खरेदी करायला बंदी घातलीय. चीन आणि ऑस्ट्रेलियातल्या घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्या मानानं न्यू झीलंडच्या शहरात जमीन आणि घरं स्वस्त असल्यामुळं भरपूर पैसे असलेले चिनी आणि ऑस्ट्रेलियन न्यू झीलँडमधे घरं विकत घेत आहेत. गेल्या १० वर्षात हा कल अधिक तीव्र झालाय. न्यू झीलँडमधे घरांची बाजारपेठ खुली होती, सरकारचं तिच्यावर नियंत्रण नव्हतं. चिनी लोक येत आणि वाट्टेल ती किमत द्यायला तयार होत. घरमालक म्हणे की चांगली किमत मिळत्ये ना, मग झालं तर. त्या…

Read More Read More

आर्थिक निर्णय, पंतप्रधान, नोकरशाही.

आर्थिक निर्णय, पंतप्रधान, नोकरशाही.

नोटबंदीनं भारताची अर्थव्यवस्था एक वर्षानं मागं नेली. काहीही निष्पन्न न झाल्यानं सगळा खटाटोप आतबट्ट्याचा ठरला. नव्या नोटा छापणं. त्या देशभर पोचवणं. जुन्या नोटा बँकेत गोळा करणं व त्यांचा हिशोब ठेवणं. प्रचार,जाहिराती. भारत सरकारची बरीच यंत्रणा याच उद्योगात काही काळ गुंतली होती. सुमारे ३.५ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.   निर्णय घेण्याचा घटनात्मक अधिकार पंतप्रधानांना आहे. तो त्यांनी वापरला. समजा त्यांनी जुगार केला असं म्हणूया. समजा त्यांनी  अज्ञानापोटी निर्णय घेतला असं म्हणूया. समजा काही तरी चमत्कारीक गोष्ट करून लोकांना भारून टाकायचं असं…

Read More Read More