Browsed by
Month: December 2018

चला, आघाड्या तयार करण्याचा मोसम आलाय

चला, आघाड्या तयार करण्याचा मोसम आलाय

चला, निवडणुक आली. कुठल्या आघाडीत जायचं ते ठरवा. देशव्यापी एकाद्या पक्षाचं राज्य असण्याचे दिवस संपलेत. भाजपच्या आघाडीनं बिहारमधलं लोकसभेचं जागा वाटप निश्चित केलंय. बिहारमधल्या ४० जागांमधल्या १७ जागा भाजपनं स्वतःकडं ठेवल्यात, १७ जागा नितीश कुमार यांच्या जदयुला दिल्यात आणि ६ जागा पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला दिल्यात. अगदी नेटकेच लोकसमता पार्टीचे कुशवाहा भाजप आघाडीतून बाहेर पडल्यानं त्यांना ५ जागा देण्याच्या संकटातून भाजप सुटला. लोकसमता पार्टी भाजप आघाडीला रामराम ठोकून काँग्रेस आघाडीत घुसलीय. काँग्रेस आघाडीचं जरा वेगळं आहे. बिहारमधली आघाडी काँग्रेस आघाडी…

Read More Read More

बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

मेरी कोल्विन सीरियातल्या धुमश्चक्रीच्या बातम्या देताना २०१२ साली मृत्यूमुखी पडल्या. बाबा अमर या गावामधे तीनेकशे स्त्रिया आणि मुलं सीरियन सरकारनं अडकवून ठेवली होती, बाँब वर्षाव करून त्यांना असद यांच्या सैनिकांनी मारलं. मेरी कोल्विन यांनी त्या घटनेचा वृत्तांत प्रसिद्ध केल्यावर सीरियन सरकार खवळलं. ड्रोनचा वापर करून सरकारनं त्यांचा पत्ता मिळवला, त्या घरावर अर्धा तास अनेक रॉकेट्सचा मारा करून घर आणि मेरी कोल्विनला खलास केलं. मेरी कोल्विननी लिबिया, इराक, कोसोवो, चेचन्या, पॅलेस्टाईन, सिएरा लिओने, इथियोपिया, लंका इत्यादी देशातल्या युद्धांवर वृत्तांत लिहिले. लंकेत…

Read More Read More

ब्रेक्झिट. ब्रिटीश नेते, ब्रिटीश खासदार, ब्रिटीश समाज, यांचं हसं होतंय.

ब्रेक्झिट. ब्रिटीश नेते, ब्रिटीश खासदार, ब्रिटीश समाज, यांचं हसं होतंय.

ब्रेक्झिटचा घोळ आता ब्रेक्झिट हा एक विनोद झाला आहे. एकाद्या देशाचं इतकं हसं यापुर्वी कधी झालं नसेल. २०१७ मधे ब्रीटननं युरोपीय युनीयनमधून (युयु) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तोही जनमत चाचणीनंतर. युयुमधे रहायचं असं सुमारे ४८ टक्के लोक म्हणत होते आणि राहू नये असं ५२ टक्के लोक म्हणत होते. म्हणजे अगदीच निमुळत्या बहुमतानं निर्णय झाला. हा निर्णय अमलात आणण्याची जबाबदारी थेरेसा मे यांनी घेतली, त्यासाठी त्या पंतप्रधान झाल्या. २०१९ च्या मार्चमधे बाहेर पडायचं ठरलं आणि त्यासाठी लागणारे कागद, करार, देवाणघेवाण यांच्या…

Read More Read More

गोरक्षण, सबरीमाला, राममंदीर. दांडगाई नको.

गोरक्षण, सबरीमाला, राममंदीर. दांडगाई नको.

दांडगाई करणाऱ्यांना आवरा. उत्तर प्रदेशात बुलंदशहरमधे एका पोलिस ठाण्यावर नागरिकांनी हल्ला केला, ठाण्याला आग लावली. पोलिस आणि नागरीक यांच्यात धुमश्चक्री झाली, गोळीबार झाला. गोळीबारात दोन जण ठार झाले पैकी एक पोलिस अधिकारी होता. योगेश राज या नावाच्या बजरंग दलाच्या एका तरूण कार्यकर्त्याच्या पुढाकारानं ही घटना घडली. योगेश राजला गावात प्राण्यांचे सांगाडे सापडले. योगेश राजचं म्हणणं होतं की ते गायीचे सांगाडे होते. योगेश काही लोकांना घेऊन पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी गोहत्या करणाऱ्यांना पकडावं, शिक्षा करावी अशी योगेशची मागणी होती. केवळ कोणीतरी…

Read More Read More