Browsed by
Month: January 2023

वाSSळवी, वाSSळवी.

वाSSळवी, वाSSळवी.

वाळवी. वाळवी हा परेश मोकाशी यांचा चौथा चित्रपट. माध्यमांत या चित्रपटावर जोरदार चर्चा चाललीय. चित्रपटाला लेबलं लावली जातायत. कॉमेडी, रहस्यम कॉमेडी, ब्लॅक कॉमेडी. पहाणाऱ्याचा जसा अनुभव, दृष्टी, जगणं, तसं लेबल. सुरवातीला एक काहीसं अशक्त मार्केटिंग झालं.तेही चुकीचं. पोस्टर केलंय ते इतकं बंडल आहे की त्यावरून काही पत्ता लागत नाही. एका कोचावर तिघं बसलेत आणि त्या कोचाचा एक पाय मोडलाय आणि तिघं कोसळत आहेत. किती निर्बुद्ध.  मराठी चित्रपट आहे, मराठी माणसानं तो उचलून धरला पाहिजे, आपण मराठी माणसंच मराठीच्या कसे विरोधात…

Read More Read More

पुस्तक: पहिल्या दिवशी १८ लाख प्रतींचा खप.

पुस्तक: पहिल्या दिवशी १८ लाख प्रतींचा खप.

Spare. Prince Harry Penguin 400 pages. ।। ब्रिटीश युवराज हॅरी यांचं स्पेअर हे आत्मचरित्र बाजारात पोचलंय. इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकानं या चरित्राचं वर्णन धांगडधिंगा या शब्दात केलंय. घांगडधिंगा करमणूक करतो, बस, तेवढंच. दी इकॉनॉमिस्ट ब्रिटीश असल्यानं त्यांना ब्रिटीश राजा, राजवाडा, राजमुकूट इत्यादी गोष्टी घरच्याच आहेत, परिचित आहेत.  त्यांना राजवाड्याबद्दल हॅरीनं घातलेला धांगडधिंगा नवं काही सांगत नाही, पण इतरांना त्यातून काही गोष्टी नव्यानं कळतात, ठसतात. आत्मचरित्र हॅरीनं लिहायला घेतलं तेव्हापासूनच गाजत होतं.  हॅरीचं आणि राजाड्याचं वाकडं होतं. हॅरीचा मोठा भाऊ युवराज विल्यम्स याच्याशीही…

Read More Read More

सिनेमा. एका महिला युद्ध बातमीदाराची थरारक गोष्ट

सिनेमा. एका महिला युद्ध बातमीदाराची थरारक गोष्ट

एका महिला युद्ध बातमीदाराची थरारक गोष्ट ए प्रायव्हेट वॉर ।। चित्रपटाचं नाव आहे ए प्रायव्हेट वॉर. चित्रपटातलं मुख्य पात्र आहे मेरी कोल्विन. ती बातमीदार आहे. लंका, इराक, अफगाणिस्तान, सीरिया इथली युद्धं तिनं कव्हर केलीयत. ऐन युद्धात ती रणात जाते आणि तिथल्या बातम्या लिहून किंवा टेलेफोनवरून पाठवते.  २००१ मधे मेरी लंकेतल्या यादवीत जाते तिथं चित्रपट सुरु होतो आणि २०१२ साली सीरियात होम्स या गावात झालेल्या हल्ल्यात मरते तिथं चित्रपट संपतो. मेरी कोल्विन ही हाडीमाशी खरीखुरी व्यक्ती होती. जन्मानं अमेरिकन, ब्रीटनमधल्या पेपरांसाठी…

Read More Read More

पुस्तकं. नट ते राष्ट्रपती, टीव्ही स्टुडियो ते उध्वस्थ इमारती.

पुस्तकं. नट ते राष्ट्रपती, टीव्ही स्टुडियो ते उध्वस्थ इमारती.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं लंडनवर ५७ दिवस बाँब वर्षाव केला. इंग्लंडच्या इतर भागावरही ९ महिने बाँब टाकले. चर्चिलनी घणाघाती भाषणांनी इंग्लीश माणसाचा आत्मविश्वास जागवला, त्याला युद्धाचे घाव सोसायला तयार केलं. असं म्हणतात की चर्चिलनी इंग्लीश शब्दकोष युद्धात उतरवला होता. आज युक्रेनच्या युद्धाला ११ महिने होताहेत. जवळपास १२ हजार युक्रेनी नागरीक रशियानं मारले. त्यात नवजात अर्भकं होती, वृद्ध होते. जवळपास दीड कोटी माणसं बेघर-परागंदा झाली. वीज निर्मिती केंद्र उध्वस्थ करून पुतीननं युक्रेनला गोठवलं, वीज आणि पाण्याविना तडफडायला लावलं. युक्रेन हार मानायला तयार…

Read More Read More