Browsed by
Month: August 2020

कमला हॅरिस यांचं पुस्तक

कमला हॅरिस यांचं पुस्तक

चेन्नईत, तामिळनाडूतल्या रस्त्यांच्या कडेला, कमला हॅरिस यांची स्थानिक चित्रकारांनी रंगवलेली चित्रं दिव्याच्या खांबाला लटकली आहेत. कित्येक चित्रं तर अशी की त्यावर नाव लिहिलंय म्हणून त्या कमला हॅरिस आहेत हे लक्षात येतं अन्यथा ते इतर कोणाही स्त्रीचं चित्र वाटलं असतं. तामिळनाडूतल्या बऱ्याच राजकीय व्यक्तींच्या चित्रांच्या बाबतीत ते खरं आहे. अम्मा असोत की बाबासाहेब. व्यक्ती पदावर पोचली की ती मोठी होते. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यावर जगाचं आणि अर्थातच भारताचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. गेल्या वर्षी त्यांचं The Truth We Hold हे…

Read More Read More

शिरीष दाते भारतात? शक्य नाही.

शिरीष दाते भारतात? शक्य नाही.

“ गेल्या साडेतीन वर्षात तुम्ही अमेरिकेन जनतेसमोर खोटं बोललात त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो कां?” एका पत्रकारानं विचारलं. व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत सामान्यपणे समर्थक पत्रकार सुखकारक प्रश्न विचारतात याची सवय असलेले प्रे. डोनल्ड ट्रंप गोंधळले. त्यांनी विचारलं “ कशा बद्दल?” “ खोटं बोललात, जी जी बेईमानी (डिसॉनेस्टी) केलीत त्या बद्दल” पत्रकार म्हणाला. “ कोणी ते केलं?” ट्रंपनी विचारलं. “ तुम्ही.” पत्रकार म्हणाला. प्रश्न विचारणारा माणूस कोण आहे ते ढुंढाळण्याच्या प्रयत्नात ट्रंप होते. या पूर्वी अनेक वेळा त्यांनी या पत्रकाराला प्रश्न विचारू…

Read More Read More

कमला हॅरिस. कर्तबगार कार्यक्षम महिला.

कमला हॅरिस. कर्तबगार कार्यक्षम महिला.

कमला हॅरिस हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमधे त्या हरल्या.   आता कमला हॅरिस नावाची एक महिला उपाध्यक्ष होऊ पहात आहे.   हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे  भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमेकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे. सहा वर्षापूर्वी कमलाचं लग्न झालं,  डग्लसच्या दोन मुली आता त्यांच्या मुली आहेत. त्या कमलाला मॉमला…

Read More Read More

लढाया, दंगली,हिंसाचार कव्हर करणाऱ्या महिला बातमीदार.

लढाया, दंगली,हिंसाचार कव्हर करणाऱ्या महिला बातमीदार.

Our Women on the Ground या नावाचं पुस्तक पेंग्वीन प्रकाशनानं अशात प्रसिद्ध केलंय. इराक, सीरिया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्की, सौदी इत्यादी अरब प्रदेशात जीव पणाला लावून पत्रकारी करणाऱ्या १९ अरब पत्रकार महिलांचे अनुभव, निबंध या पुस्तकात आहेत.    आपला अनुभव असा की प्रत्येक युद्धाच्या वेळी पत्रकार रकाने भरभरून युद्धाचा उन्माद निर्माण करतात. युद्धात माणसं मरतात हे भीषण  वास्तव पत्रकार रम्य आणि उदात्त करून टाकतात. माणूस मेल्यावर स्वर्गात जातो, तो हुतात्मा होतो वगैरे गोष्टी युद्धात भाग न घेणाऱ्या लोकांना बोलायला सोप्या असतात….

Read More Read More