Browsed by
Month: October 2018

गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.

गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.

जे झालं ते बरंच झालं. पोलिस हे प्रकरण काय आहे ते कळलं तरी. सीबीआयचे उपसंचालक देवेंद्र कुमार अटकेत आहेत. लाचबाजीचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यावर लाचबाजीचा आरोप असून त्यांची चौकशी चाललीय. त्यांनाही अटक होऊ शकते. सीबीआयचे विद्यमान संचालक आलोक वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी लाचबाजीचा आरोप केला आहे. वर्मा आणि अस्थाना या दोघांनाही कामावरून दूर करून त्यांच्या जागी नागेश्वर राव या संचालकांची नेमणूक झाली. त्यांच्या विरोधातही सीबीआयमधे भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. थोडासा तपशील कळावा म्हणून राकेश अस्थाना यांचं उदाहरण…

Read More Read More

२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

आर्थिक विकास आणि ज्ञान निर्मिती; पर्यावरण प्रदुषण आणि आर्थिक धोरण; या दोन एकमेकांशी संबंधित नसलेल्या पण महत्वाच्या विषयावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या दोन अर्थशास्त्रींना २०१८ सालचं नोबेल पारितोषिक मिळालंय. पॉल रोमर यांनी १९८६ आणि १९९० मधे प्रकाशित केलेल्या प्रबंधांचा विचार नोबेल समितीनं केला. प्रबंधांत त्यांनी ज्ञान निर्मिती आणि आर्थिक विकास यातील संबंधांचं विवेचन केलं आहे. रोमर हार्वर्डमधे प्रोफेसर होते आणि सध्या न्यू यॉर्क विश्वशाळेत संशोधन करतात. काही काळ ते विश्व बँकेचे आर्थिक सल्लागारही होते. विल्यम नॉर्डहॉस येल विश्वशाळेत अर्थशास्त्र शिकवतात. १९७०…

Read More Read More

२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै. नेटफ्लिक्सवर १० ऑक्टोबरला प्रकाशित झालेली २२ जुलै पहात असताना मनात येतं की यंदाच्या ऑस्करमधे या फिल्मचा नंबर लागू शकेल. नॉर्वेमधे दहशताद्यानं एक इमारत उडवली आणि एका बेटावर शिबिरासाठी जमलेल्या ६९ मुलांना ठार मारलं असा विषय चित्रपटाच्या केंद्रात आहे. विषयामधे प्रचंड नाट्य आहे, थरार आहे आणि त्याला प्रचंड दृश्य मूल्य आहे. थरार आणि नाट्य हे दोन घटक चित्रपट मर्यादेत ठेवतो आणि माणसं, माणसांतले संबंध, माणसातल्या विकृती, माणाची लढाऊ वृत्ती, माणसाचं शहाणपण आणि मूर्खपणा इत्यादी पैलू दाखवतो. दोन चित्रपटांची आठवण…

Read More Read More

मोदी शहा पक्षाचं हमी भावाचं नाटक

मोदी शहा पक्षाचं हमी भावाचं नाटक

२ ऑक्टोबर रोजी सुमारे तीसेक हजार शेतकरी आपलं रडगाऱ्हाणं घेऊन दिल्लीत गेले. पोलिसांनी त्यांच्यावर पाणी आणि लाठ्यांचा मारा केला. अनेक जुन्या जखमांत आणखी एका जखमेची भर घालून शेतकरी शेतोशेती परतले. ४ ऑक्टोबर रोजी मोदीशहा सरकारनं गहू, नाचणी ही धान्यं; मसूर, चणा या डाळी, मोहोरी या पिकांच्या रब्बीच्या हमी भावात वाढ जाहीर केली. नोव्हेंबर महिन्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेश या मोदीशहा पक्षाच्या राज्यात निवडणुका आहेत. तिथं जनतेमधे चलबिचल आहे, जनता मोदीशहा सरकारं पाडण्याच्या बेतात आहे अशा बातम्या आहेत. वरील पिकं वरील…

Read More Read More